मुलांच्या तस्करीप्रकरणी भाजप नेत्याला अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीआयडी) पिंटल गावात उभारण्यात आलेल्या कार्यालयात तिची चौकशी करण्यात आली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

कोलकता - लहान मुलांच्या तस्करीप्रकरणीतील प्रमुख आरोपी भाजप नेत्या जुही चौधरी हिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात भाजप नेते कैलाश विजयवर्गीय आणि रुपा गांगुली यांचेही नाव आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यात उघडकीस आलेल्या मुलांच्या तस्करी प्रकरणात प्रमुख आरोपी जुही चौधरी हिला भारत-नेपाळ सीमेजवळून मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. बतासी भागातील 17 मुलांची तस्करी केल्याप्रकरणी जुही चौधरीचा शोध घेण्यात येत होता. अखेर तिला अटक करण्यात यश आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीआयडी) पिंटल गावात उभारण्यात आलेल्या कार्यालयात तिची चौकशी करण्यात आली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

चंद्रना चक्रवर्ती या महिलेला अटक करण्यात आल्यानंतर जुही चौधरीबाबत माहिती मिळू शकली. चक्रवर्ती हिने सांगितले की जुही ही सतत भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय आणि बंगालच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपा गांगुली यांच्या संपर्कात असायची. जलपाईगुडी येथील विमला शिशू गृह या मुलांना दत्तक घेणाऱ्या संस्थेच्या चंदना चक्रवर्ती अध्यक्षा आहेत. या संस्थेने 17 मुलांची तस्करी केल्याचा आरोप आहे.

Web Title: BJP leader arrested in child trafficking case, accused names Kailash Vijayvargiya, Roopa Ganguly