धक्कादायक! आईला औषधे देऊन येत असताना भाजप नेत्यावर अज्ञातांकडून गोळीबार

अज्ञातांच्या हल्ल्यात भाजप नेता गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत
crime
crime sakal
Summary

अज्ञातांच्या हल्ल्यात भाजप नेता गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत

उत्तरप्रदेशातील मैनीपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आईला औषधे देऊन घरी परत येत असताना भाजपच्या एका नेत्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला आहे. या घटनेमुळे मैनपुरी येथे शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली असुन परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

अज्ञातांच्या या हल्ल्यात भाजप नेता गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोळीबार करुन हल्लेखोर पळून गेले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराहट पसरली असून नागरिक या घटनेची तात्काळ चौकशीची मागणी करत आहेत.

crime
अग्निपथवर होणार मोठा निर्णय? लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांची पत्रकार परिषद

मिळालेली माहिती अशी की, भाजपा अनुसूचित जाती युवा मोर्चाचे जिलाध्यक्ष गौतम कठेरिया हे काल (शनिवारी) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या आईला औषधे देण्यासाठी मैनपुरी येथे गेले होते. त्यांची आई दुसऱ्या ठिकाणी राहते. दुचाकीवरुन येथून परत येत असताना भौगांव-मैनपुरी रस्त्यावर त्यांच्यावर तीन ते चार गोळ्या झाडण्यात आल्या. यात ते गंभीर झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना आगरा येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गोळीबारानंतर दुचाकीवरुन आलेले दोघे हे पळून गेले.

कठेरिया यांच्या डोक्याला गोळी लागली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॅाक्टारांनी सांगितले. या घटनेनंतर मैनपुरी जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलिस हल्लेखोराचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे (ncp) अध्यक्षाच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना काल उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात घडली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून गोळीबाराचे कारण अद्याप कळू शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे.

crime
Father's Day Special I दप्तर हरवलं खरं पण, नानांनी घालून दिलेली शिस्त पुन्हा मोडली नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com