कोलकत्यात भाजप नेत्याच्या घरावर हल्ला

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

कोलकता- तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला अटक झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला नेत्याच्या घरावरी मंगळवारी (ता. 3) रात्री हल्ला केला.

कोलकता- तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला अटक झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला नेत्याच्या घरावरी मंगळवारी (ता. 3) रात्री हल्ला केला.

रोझ व्हॅली चिट फंड घोटाळयात सीबीआयने मंगळवारी तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील संसदीय पक्षाचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांना चौकशीनंतर अटक केली. बंडोपाध्याय हे ममता बॅनर्जी यांच्या निकटच्या वर्तुळातील नेत्यांपैकी एक आहेत. या घोटाळ्याप्रकरणी तृणमूलचे आणखी एक खासदार तापस पाल पोलिस कोठडीत आहेत. बंडोपाध्याय यांनी आरोप फेटाळून लावताना केंद्र सरकारने आपल्या विरुद्ध आणि तृणमूलविरुद्ध राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे.

बंडोपाध्याय यांना अटक झाल्याने नाराज झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप नेते कृष्णा भटाचार्य यांच्या घरावर दगडफेक करत हल्ला केला. या घटनेत त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी नोटाबंदी विरोधात घोषणाबाजी केली, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी आज दिली.

भटाचार्य यांच्या घरावर दगडफेक झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरामध्ये पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Web Title: BJP leader Krishna Bhattacharya’s house allegedly attacked by TMC workers