
L Rameshwor Singh : मणिपूरमध्ये भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या; तपास सुरू
मणिपूरमधील भारतीय जनता पक्षाचे नेते एल रामेश्वर सिंह यांची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
हेही वाचा : ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी
छातीत गोळ्या लागलेल्या ५० वर्षीय सिंग यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिंग यांच्यावर नंबर प्लेट नसलेल्या गाडीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी सकाळी १० ते ११.३० च्या सुमारास बेछूट गोळीबार केला. यात सिंग यांच्या छातीवर दोन गोळ्या लागल्या.
त्यानंतर सिंग यांना तातडीने उपचारांसाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुपारी एकच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला,अशी माहिती थौबल पोलिसांनी दिली आहे.
या घटनेनंतर परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून, हल्लेखोरांचा तपास सुरू करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे नेमका कुणाचा हात आहे हे लगेच सांगणे कठीण असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.