हो.. मी राहुल गांधीशी बोललो.. काय प्रॉब्लेम? : गडकरी

वृत्तसंस्था
शनिवार, 2 फेब्रुवारी 2019

नितीन गडकरी यांनी एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबतचा खुलासा केला आहे. मी ठरवून मैत्री करत नाही. राजकारणात मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावे. राजकारणाचा एक स्तर आपण जपला पाहिजे, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात काय गुफ्तगू झाले हे स्वतः गडकरी यांनी उघड केले आहे.

राहुल गांधी आणि गडकरी यांच्यात राजपथावरील कार्यक्रमात रंगलेल्या गप्पा हा चर्चेचा विषय ठरला होता. यांच्यात काय चर्चा झाली, याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत होते. मात्र. गडकरींनी राहुल गांधींसोबत काय चर्चा केली हे उघड केले आहे. राहुल गांधींसोबत सर्वसाधारण चर्चा झाली. रॅली आणि प्रजासत्ताक दिन यासंदर्भात आमच्यात गप्पा रंगल्या होत्या, असे गडकरींनी म्हटले आहे. तसेच त्यांनी राहुल गांधी यांच्याशी गप्पा मारण्यात गैर काय?, असेही म्हटले आहे.

नितीन गडकरी यांनी एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबतचा खुलासा केला आहे. मी ठरवून मैत्री करत नाही. राजकारणात मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावे. राजकारणाचा एक स्तर आपण जपला पाहिजे, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Nitin Gadkari reveles talked with Congress president Rahul Gandhi