BJP Leader Raja Singh Criticizes Asaduddin Owaisi
BJP Leader Raja Singh Criticizes Asaduddin Owaisi

'...तर ओवेसींनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी'

नवी दिल्ली : 'एमआयएम'चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांना 'भारतमाता की जय' म्हणायचे नसेल तर त्यांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी, असा सल्ला तेलंगणातील भाजपचे नेते टी. राजा सिंग यांनी दिला. तसेच भारतामध्ये 'भारतमाता की जय' म्हणायचे नसेल तर काय पाकिस्तानात जाऊन म्हणणार का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

असदुद्दीन ओवेसी यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात 'भारतमाता की जय' आणि 'वंदे मातरम्' म्हणणार नाही, असे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्यावर निशाणा साधताना राजा सिंग म्हणाले, ''भारतामध्ये 'भारतमाता की जय' म्हणायचे नसेल तर काय पाकिस्तानात जाऊन म्हणणार का? त्यामुळे तुमचे तुमच्या देशावर प्रेम नसेल तर देश सोडून पाकिस्तानात चालते व्हा''. 

दरम्यान, जी व्यक्ती 'भारतमाता की जय' किंवा 'वंदे मातरम्' म्हणणार नसेल, अशा व्यक्तीला भाजपची सत्ता आल्यास राज्यातून हाकलून देऊ, असेही राजा सिंग म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com