भाजप नेत्यावरील छाप्यात 1.33 कोटी रुपये जप्त

श्‍यामल रॉय
बुधवार, 7 डिसेंबर 2016

कोलकता - पोलिसांनी केलेल्या कारवाईत राज्य भाजपच्या एका नेत्यासह सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 1.33 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या. हा नेता वर्धमान जिल्ह्यातील असून, त्याचे साथीदार कोळसामाफिया असल्याचा संशय आहे.

राज्य भाजपला बसलेला हा दुसरा झटका आहे. मुलांच्या तस्करीत गुंतलेल्या एका डॉक्‍टर पदाधिकाऱ्याला पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. पाठोपाठ दुसऱ्या नेत्याला अटक झाली आहे. आज अटक झालेल्या नेत्याच्या बागूहाटी येथील सदनिकेतून नोटांबरोबरच तीन अग्निशस्त्रेही जप्त करण्यात आली असून, आरोपींना नऊ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी भाजप नेते मनीष शर्मा यांच्या बागूहाटी येथील निवास्थानावर छापा घातला. तीन तासांच्या झडतीनंतर पोलिसांना रक्कम आणि अग्निशस्त्रे सापडली. अटक झालेले अन्य पाच जण वर्धमान जिल्ह्यातील दुर्गापूर-आसनसोल-राणीगंज विभागातील कोळसामाफिया असल्याचे सांगितले जाते. जुन्या नोटा नव्या स्वरूपात बदलून देणारी ही टोळी असल्याचाही अंदाज आहे. मनीष शर्माही कोळशाच्या व्यवहारात आहे. भाजपच्या राणीगंज मंडळाचा अध्यक्ष असल्याचे व्हिजिटिंग कार्डही त्याने बनविले आहे. शर्मा दोषी असल्यास त्याच्यावर कारवाईचे आश्‍वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी दिले.

Web Title: BJP leader seized Rs 1.33 crore