शाहनवाज हुसेन यांना कोर्टाचा दिलासा; FIR दाखल करण्यास ‘सर्वोच्च’ स्थगिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp leader shahnawaz hussain relief supreme court stay on lodge fir rape case crime

शाहनवाज हुसेन यांना कोर्टाचा दिलासा; FIR दाखल करण्यास ‘सर्वोच्च’ स्थगिती

नवी दिल्ली : बलात्कारप्रकरणामध्ये भाजपचे नेते शाहनवाज हुसेन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून आज दिलासा मिळाला. दिल्ली उच्च न्यायालयाने हुसेन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे दिलेले आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले आहेत. दिल्लीतील एका महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले होते. न्या. यू. यू. ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याप्रकरणी नोटीस बजावतानाच दिल्ली सरकारला याबाबत म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही सप्टेंबरमध्ये होईल.

दिल्ली उच्च न्यायालयाने १७ ऑगस्ट रोजी कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशांना आव्हान देणारी हुसेन यांची याचिका फेटाळून लावत एफआयआर दाखल करण्याचे दिलेले निर्देश कायम ठेवले होते. एका महिलेने हुसेन यांच्यावर बलात्काराचा आरोप करत २०१८ मध्ये कनिष्ठ न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर ७ जुलै २०१८ रोजी न्यायदंडाधिकाऱ्यांनी हुसैन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिलेले होते.

‘पीएमएलए’संदर्भात फेरआढावा

‘मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायद्याबाबत (पीएमएलए) देण्यात आलेल्या ताज्या आदेशांचा फेरआढावा घेण्यात यावा,’अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्याची तयारी दर्शविली आहे.

‘सेटलवाड’प्रकरणी राज्याचे म्हणणे मागविले

सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी गुजरात सरकारला म्हणणे मांडण्यास सांगितले असून याप्रकरणाची पुढील सुनावणी २५ ऑगस्ट रोजी होईल. सेटलवाड यांच्यावर गुजरात दंगलीप्रकरणी बनावट दस्तावेज तयार करून निष्पापांना त्यात गोवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता, जूनमध्ये त्यांना याचप्रकरणात अटकही करण्यात आली होती.

Web Title: Bjp Leader Shahnawaz Hussain Relief Supreme Court Stay On Lodge Fir Rape Case Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..