देवेंद्र फडणवीसांनंतर भाजपच्या 'या' दोन केंद्रिय नेत्यांकडून पुन्हा मोठी चूक

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 10 May 2020

देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच भारतीय जनता पक्षाच्या आणखी दोन मोठ्या नेत्यांनी केली चूक केली आहे.

मुंबई : छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करताना त्यांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा देवेंद्र फडणवीस यांच्या सोशल मीडिया अकाऊंटसवरून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आता अशीच चूक भारतीय जनता पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

काल (ता. ०९) समाजसुधारक गोपाळ कृष्ण गोखली यांची जयंती होती. या जयंतीनिमित्त अभिवादन करताना ट्विटरवर भाजपचे नेते आणि माजी केंद्रिय मंत्री खासदार सुभाष भामरे यांनी लोकमान्य टिळक यांचा फोटो जोडला होता. यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर टीकाही झाली. ही चूक लक्षात आल्यानंतर मात्र हे ट्विट भामरे यांच्या ट्विटर खात्यावरून हटविण्यात आले आहे.

काँग्रेसला मोठा धक्का; एजेएलच्या संपत्तीवर अखेर ईडीची टाच

''सर्वेंट्स ऑफ इंडिया के संस्थापक, समाज सुधारक, धर्म के विद्वान और स्वतंत्रता सेनानी श्री गोपालकृष्ण गोखले की 154वीं जन्मजयंती पर उन्हें शत शत नमन।'' असे हिंदीतून ट्विट करत त्याला #GopalKrishnaGokhale असा हॅशटॅग वापरून भामरे यांच्या ट्विटर अकाऊंटवरून बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक यांचा फोटो जोडण्यात आला होता.
Image
भामरे यांच्यानंतर अशीच चूक भाजपच्या आणखी एका मंत्र्याने केली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रिय मंत्री अर्जुन मुंडा यांच्याकडूनही अशाच प्रकारची चूक घडली आहे. त्यांनीही गोपाळ कृष्ण गोखले यांच्या जयंतीनिमीत्त अभिवादन करताना लोकमान्य टिळक यांचा फोटो जोडला आहे.

Image


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader shares Bal Gangadhar Tilaks picture while paying respect to Gopal Krishna Gokhale