भाजपच्या प्रवक्त्यांनी केले धक्कादायक ट्विट

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 एप्रिल 2018

भारद्वाज यांनी आपल्या ट्विटचे समर्थन केले आहे व हे ट्विट मी भाजप अध्यक्षांचे लक्ष वेधून घेण्यासाठी केले आहे, असेही सांगितले. आम्ही महिलांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने विचार करतो व तशी पावले उचलतो. पण आपलेच आमदार - कुलदीपसिंह सेंगार यांना 18 वर्षीय महिलेवर बलात्कर व हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशतील भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या दिप्ती भारद्वाज यांनी एक धक्कादायक ट्विट केले आहे. उन्नावमधील बलात्काराच्या घटनेप्रकरणी भाजप आमदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. अशा घटनेमुळे उत्तर प्रदेशातील पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे, यासाठी काहीतरी उपाययोजना करा व उत्तर प्रदेशला वाचवा असेही भारद्वाज यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.  

'आदरणीय अमितजी, उत्तर प्रदेशला वाचवा. उत्तर प्रदेश सरकारचे निर्णय हे अत्यंत लाजविणारे आहेत. यांमुळे आपले सरकार धोक्यात येईल व आपण बघितलेली स्वप्ने फोल ठरतील', असे अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून भारद्वाज यांनी ट्विटमध्ये लिहीले आहे. या आशयाला धरूनच त्यांनी आणखी एक ट्विट केले ज्यात म्हणले आहे, 'अशा दुर्दैवी घटनांमुळे उत्तर प्रदेशची व भाजपची प्रतिमा मलीन होत आहे. याचे धोकदायक परिणाम 2019 मध्ये होणाऱ्या निवडणूकीमध्ये दिसतील.'

भारद्वाज यांनी आपल्या ट्विटचे समर्थन केले आहे व हे ट्विट मी भाजप अध्यक्षांचे लक्ष वेधून घेण्यासाठी केले आहे, असेही सांगितले. आम्ही महिलांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने विचार करतो व तशी पावले उचलतो. पण आपलेच आमदार - कुलदीपसिंह सेंगार यांना 18 वर्षीय महिलेवर बलात्कर व हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हे पक्षासाठी अत्यंत निंदनीय आहे, असे भारद्वाज यांनी माध्यमांना सांगितले.  

Web Title: BJP leader urges Amit Shah to ‘save UP’