'पाकिस्तान, चीननेच दिल्लीत विषारी वायू सोडला'; भाजप नेत्याची मुक्ताफळे

वृत्तसंस्था
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

आपल्या शेजारील जे घाबरलेले पाकिस्तान व चीन हे देश आहेत, यांनीच हा विषारी वायू दिल्लीत सोडला आहे. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषणाची तीव्रता गेले काही दिवस वाढली आहे....

नवी दिल्ली : सध्या दिल्लीतल्या प्रदूषणाने एनसीआरमध्ये तीव्रता वाढत आहे. सरकारचे व हवामान विभागाचे यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीतल्या दैनंदिन जीवनावर व वाहतूकीवर याचा मोठा परिणाम झालाय. अशातच भाजप नेत्याने असंबद्ध विधान करून दिल्ली प्रदूषणाचा विषय पुन्हा चर्चेत आणला आहे. 

पाकिस्तानी गायिका पिरजादाचा न्यूड व्हिडिओ व्हायरल

मेरठमधील भाजप नेते विनीत अग्रवाल यांनी दिल्लीतील प्रदूषण हे पाकिस्तान आणि चीनमुळे होत असल्याचे विधान केले आहे. आपल्या शेजारील जे घाबरलेले पाकिस्तान व चीन हे देश आहेत, यांनीच हा विषारी वायू दिल्लीत सोडला आहे. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषणाची तीव्रता गेले काही दिवस वाढली आहे. पाकिस्तान दिवाळखोराने त्रस्त आहे, त्यांनीच हे कृत्य केले असेल, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियात त्यांची खिल्ली उडवली जात आहे. 

आता कामाचे तास नऊ होणार!

अग्रवाल हे भाजपच्या व्यापार विभागाचे संयोजक आहेत. यापूर्वीही त्यांनी अशी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. पण या वक्तव्यामागे काहीच तथ्य नसल्याने भाजपचे नेते अशी वक्तव्ये कशी करतात, असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. पाकिस्तानचा शेवट जवळ आलाय, भारताचे नुकसान व्हावे, भारतातील शेतकऱ्यांचे व उद्योगांचे नुकसान व्हावे असे त्यांना वाटते, म्हणून त्यांनी हा विषारी वायू सोडला आहे, असेही अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.

पंजाब व हरियानातील तण जाळले जात आहेत व त्यामुळे दिल्लीची हवा खराब होत आहे, असे न्यायालयाने सांगितले आहे.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Vinit Agawal makes controversial statement related to china and Pakistan