गोव्यात भाजपची तातडीची बैठक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना रुग्णालयात दाखल केले असल्याने व त्यांची प्रकृती काहीशी गंभीर असल्याने घटक पक्षांना बरोबर घेऊन सरकार पुढे कसे चालविता येईल याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

गोवा : भारतीय जनता पक्षाची आज (सोमवार) सकाळी साडेदहा वाजता पणजीच्या मुख्यालयात सर्व भाजप आमदार व काही ज्येष्ठ नेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

भाजप नेते बी. एल. संतोष यांच्या अध्यक्षतेखाली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक होणार असून विजय पुराणिक हेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या ज्येष्ठ नेत्यांना तातडीने गोव्यात पाठवून निवडणूकसंदर्भातचा आढावा घेण्यास पाठविले आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना रुग्णालयात दाखल केले असल्याने व त्यांची प्रकृती काहीशी गंभीर असल्याने घटक पक्षांना बरोबर घेऊन सरकार पुढे कसे चालविता येईल याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leaders emergency meeting in Goa