माझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न : रमेश तवडकर

अवित बगळे
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पणजी : माझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न दक्षिण गोव्याचे खासदार अॅड नरेंद्र सावईकर व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तप्रसाद खोलकर यांनी केला. त्याचमुळे सरऴपणे मी भाजपमध्ये कसा परतू असा प्रश्न माजी मंत्री रमेश तवडकर यांनी उपस्थित केला. ते स्वगृही परतणार असल्याची चर्चा सुरु झाल्याने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील निवेदन केले. तवडकर यांना २०१७  च्या निवड़णुकीत भाजपने उमेदवारी नाकारली होती.

ते म्हणाले, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मला भेटण्यास बोलावले. मी तेथे गेलो. मुख्यमंत्र्यांनी मला भाजपमधील मोठा नेता झालेला बघायला हवा आहे असे सांगितले. त्यावर माझी राजकीय कारकीर्द तुम्हीच संपवण्यास निघाला असे सांगितले. माझ्या सामाजिक कार्याची कदर करणारा कोणी नेता आज भाजपमध्ये आहे का अशी विचारणा केल्यावर मुख्यमंत्री काही बोलले नाहीत. त्यांना मी भेटलो म्हणून मी भाजपमध्ये जाणार या मुद्दामहून उठवल्या जाणाऱ्या वावड्या आहेत. तसा कोणताही निर्णय मी घेतलेला नाही. मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचे झालेले प्रयत्न मी कसा विसरू हा माझा सवाल आहे.

ते म्हणाले, मंत्री म्हणून मी पदाला न्याय दिला होता. असे असतानाही केवळ काही जणांच्या सांगण्यावरून मला विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली. माझ्या संस्थांचे अनुदान रोखून मुस्कटदाबी करण्यात आली. प्राप्तीकर खात्याकरवी छापा टाकण्यात आला. वन खात्याशी संबंधित जूना गून्हा उकरून काढून त्याचा बाऊ करण्यात आला. हे सारे मी विसरलेलो नाही. संघ आणि भाजपच्या मुशीतून तयार झाल्याने त्या पक्षाविषयी एका मर्यादेपर्यंत मला प्रेम होते. प्रदेशाध्यक्षपदी लक्ष्मीकांत पार्सेकर व संघटनसचिवपदी सतीश धोंड यांना नेमल्यास पक्ष पुन्हा उभारी घेईल असे वाटते तरीही त्या वाटण्याला आता मर्यादा आहेत.

लोक काय म्हणतात हे माझ्यासाठी महत्वाचे आहे असे सांगून ते म्हणाले, मी जनसंपर्कावर भर देतो. जनभावना माझा निर्णय ठरवतात.त्यामुळे पुढील राजकीय वाटचाल कशी करावी याचा निर्णय कार्यकर्तेच घेतील. मी लोकसभा निवडणूकीची तयारी केली हे आधीच जाहीर केले आहे. मला संपवण्यास निघालेल्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी मी रिंगणात उतरणार आहे. आता माघार नाही.

Web Title: bjp leaders try to finish my political work says Ramesh Tawadkar