कर्नाटक पोटनिवडणूकीत १५ पैकी ११ मतदारसंघात भाजप आघाडीवर

Karnataka Assembly Bye-Election 2019 In Athani Kagwad Gokak
Karnataka Assembly Bye-Election 2019 In Athani Kagwad Gokak

बेळगाव - कर्नाटकातील १५ विधानसभा मतदारसंघातील पोटणीवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. १५ पैकी ११ मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातही भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. गोकाकमध्ये माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे काँग्रेस उमेदवार लखन जारकीहोळी यांच्यापेक्षा तब्बल 15 हजार मतांनी पुढे आहेत. कागवाड मतदारसंघात भाजपच्या श्रीमंत पाटील यांनी काँग्रेस उमेदवार राजू कागे यांच्यावर 6 हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली आहे. अथणी मतदारसंघात भाजप उमेदवार महेश कुमठळी यांनी कॉंग्रेस उमेदवार गजानन मंगसूळी  यांच्यावर आघाडी घेतली आहे. राज्यात सत्ता टिकविण्यासाठी भाजपचे सात उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत भाजपचे ११ उमेदवार आघाडीवर आहेत. 

दरम्यान, धर्मनिरपेक्ष जनता दल-काँग्रेस युती सरकार कोसळण्यास कारणीभूत ठरलेल्या व भारतीय जनता पक्षात प्रवेश करून निवडणूक लढलेल्या १५ अपात्र आमदारांचे भवितव्य यात ठरणार आहे. त्याचबरोबर राज्यातील भाजप सरकार तरणार की पडणार, याचाही फैसला होईल. राज्यातील १५ मतदारसंघात झालेल्या या पोटनिवडणुकीची मतमोजणी ११ केंद्रावर होणार बेळगाव जिल्ह्यातील तीन मतदारसंघांची मतमोजणी एकाच ठिकाणी आरपीडी महाविद्यालयात सुरू आहे. तर बंगळुरातील दोन मतदारसंघांची मतमोजणीही एकाच ठिकाणी होईल. सर्वत्र सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. तर दुपारी बारा ते एकपर्यंत सर्व मतदारसंघांचा निकाल लागण्याची शक्‍यता आहे. 

होसकोटे मतदार संघात सर्वाधिक ९० टक्के मतदान

यंदा होसकोटे मतदार संघात सर्वाधिक ९० टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी ४६.७४ टक्‍के मतदान के. आर. पेठे मतदारसंघात झाले आहे. निवडणुकीत भाजप व काँग्रेसने सर्व १५ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर धजदने १२ मतदारसंघात निवडणूक लढविली आहे. काँग्रेसने १२ जागांवर तर धजदने ५ जागांवर विजय मिळण्याचा विश्‍वास व्यक्त केला आहे. तर भाजपने १३ जागा मिळण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. त्यामुळे, कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतात हे दुपारीच कळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com