बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का, खासदार अर्जुन सिंह टीएमसीमध्ये दाखल

bjp lok sabha mp arjun singh joins tmc in kolkata
bjp lok sabha mp arjun singh joins tmc in kolkata

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. बराकपूरचे खासदार अर्जुन सिंह यांनी रविवारी घर वापसी करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत कोलकाता येथे त्यांनी पक्षात प्रवेश केला.

बंगालमधील बराकपूरचे भाजप खासदार अर्जुन सिंग यांच्या अलीकडील ट्विटमुळे ते पक्षात असमाधानी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अर्जुन सिंह यांनी अलीकडेच पश्चिम बंगालमधील भाजप नेतृत्वावर पक्षात वरिष्ठ पदावर राहूनही ते योग्य पद्धतीने काम करू देत नसल्याची टीका केली होती.

bjp lok sabha mp arjun singh joins tmc in kolkata
केंद्रानंतर राज्याचा मोठा निर्णय! पेट्रोल 2.8 तर डिझेल 1.44 रूपयांनी स्वस्त

अर्जुन सिंह 2001 मध्ये टीएमसीचे आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले होते. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाने बराकपूरमधून तिकीट दिले आणि ते खासदार झाले. तब्बल तीन वर्षांनंतर ते पुन्हा एकदा जुन्या पक्षात गेले आहेत. अर्जुन सिंह यांची राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षापासून सुरू झाली. नंतर टीएमसीमध्ये सामील झाले आणि आमदारही झाले.

अभिषेक बॅनर्जी यांनी ट्विट केले अर्जुन सिंह यांचे स्वागत केले आहे. देशभरातील लोक त्रस्त आहेत आणि त्यांना आता आमची गरज आहे. चला लढा चालू ठेवूया, असेही ते म्हणाले आहेत.

bjp lok sabha mp arjun singh joins tmc in kolkata
इंधन दर कपातीवर शरद पवारांची चार शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com