हिंदूनी मुस्लिम महिलांवर बलात्कार करायला हवा: भाजप नेता

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जुलै 2019

10 हिंदूनी एकत्र येऊन त्यांची (मुस्लिम) बहिण व आईवर मोकळ्या रस्त्यावर सामूहिक बलात्कार करायला हवा.

नवी दिल्लीः हिंदू पुरुषांनी मुस्लिमांच्या घरामध्ये घुसून त्यांच्या महिलांवर बलात्कार करायला हवा, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशमधील रामकोला येथील भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या नेत्या सुनिता सिंह गौड यांनी सोशल मीडियावर केले होते. फेसबुकवर टीका सुरू झाल्यानंतर त्यांनी ती पोस्ट काढून टाकली.

गौड यांनी फेसबुकवर लिहीले होते की, 'एक उपाय आहे की, 10 हिंदूनी एकत्र येऊन त्यांची (मुस्लिम) बहिण व आईवर मोकळ्या रस्त्यावर सामूहिक बलात्कार करायला हवा. पुढे हत्या करून भर बाजारात लटकावयाला हवे. दगडाचे उत्तर दगडानेच द्यायला हवे. मुस्लिम माता व बहिणींचा 'सन्मान' लुटला पाहिजे. कारण, भारताची सुरक्षा करण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नाही.'

दरम्यान, काही वेळातच फेसबुकवरून ही पोस्ट काढून टाकण्यात आली. परंतु, या पोस्टचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या पोस्टबाबत ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'वादग्रस्त प्रतिक्रेयाला स्थान नाही. गौड यांना 27 जून रोजी पदावरून हटविण्यात आले आहे.'

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Mahila Morcha Leader Says Hindus Should Gangrape Muslim Women Gets Expelled