कर्नाटकात सत्तेसाठी भाजपने आखला 'हा' प्लॅन

yeddyurappa
yeddyurappa

बंगळुर : कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार कोसळल्यानंतर भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी प्लॅन आखला असून, त्यानुसार ते पुढील पाऊले टाकणार आहेत. नवे सरकार स्थापन होईपर्यंत बंडखोर आमदारांना कर्नाटकात न आणण्याचा प्लॅन बनविण्यात आला आहे.

कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करता न आल्याने कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार मंगळवारी कोसळले. कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर आता भाजपाने सरकार स्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सध्या मुंबईत तळ ठोकून असलेले काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदार येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरच बंगळुरमध्ये परतण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कुमारस्वामी सरकार बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्याने बंडखोर आमदार खूप आनंदी असल्याचा दावा भाजपामधील सूत्रांनी केला आहे.

येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बंडखोर आमदार मुंबईतून माघारी येतील. पुढील दिशा ठरवण्यासाठी मंगळवारी रात्री भाजपच्या आमदारांची बैठक येडियुरप्पांच्या अध्यक्षतेखाली एका हॉटेलमध्ये झाली होती. आज पुन्हा आमदारांची बैठक होणार आहे. तसेच येडियुरप्पांनी भाजप अध्यक्ष अमित शाहांना पत्र लिहून समर्थन दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com