#MeToo भाजप नेत्यावर शोषणाचे आरोप

Minister MJ Akbar
Minister MJ Akbar

नवी दिल्ली: बॉलिवूडनंतर MeToo चे वादळ आता राजकारणातही पोहोचले असून, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार एम. जे. अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. एम. जे. अकबर यांनी या आरोपांबाबत आपली भूमिका अद्याप मांडलेली नाही. एम. जे. अकबर हे केंद्र सरकारमध्ये परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री आहेत.

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तणूकीचे आरोप केले होते. यानंतर MeTooचे वादळ सुरू झाले आहे. अभिनेत्री व लेखिकांनी MeToo म्हणून ट्विट सूर केली आहे. बॉलिवूडमधून सुरू झालेले MeTooचे वादळ आता राजकारणापर्यंत पोहचले आहे. एम. जे. अकबर यांचे पत्रकारितेमध्ये मोठे नाव आहे. त्यांचे नाव, सन्मान आणि कार्यामुळे त्यांना परराष्ट्र राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी शोषणाचे आरोप केल्याने आता माध्यम आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रिया रमानी यांनी ट्विटरवरून आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे.

प्रिया रमानी यांनी लिहिली आहे की, 'या पोस्टमध्ये एम. जे. अकबर यांच्यासोबतची माझी कहाणी आहे. कधीही त्यांचे नाव घेतले नाही, कारण त्यांनी ‘काही’ केले नव्हते. अनेक महिलांकडे या शिकाऱ्याच्या असंख्य घृणास्पद कहाण्या आहेत. त्या आता पुढे येतील अशी आशा आहे. एक युवा पत्रकार म्हणून आम्ही एम. जे. अकबर यांना सन्मानपूर्वक पाहात होतो. अकबर यांच्यासोबत काम करणे म्हणजे एक स्वप्न होते. पण...'

प्रिया रमानी यांनी लिहिलेली मुळ पोस्ट:
ये तथ्य एम. जे. अकबर के बारे में लिखने से शुरू कर रही हूं. उनके बारे में बहुत सारी महिलाओं के बुरे अनुभव हैं. उम्मीद हैं वो भी इसे साझा करेंगी. आपने मुझे करियर में पहला पाठ पढ़ाया. मैं 23 की थी और आप 43 के. आप को पढ़ते हुए मैं बड़ी हुई थी, प्रोफेशनली आप मेरे हीरो थे. सभी लोग कहते थे आपने देश की पत्रकारिता को बदल दिया है, इसलिए मैं आपकी टीम का हिस्सा बनना चाहती थी. आपने मुझे इंटरव्यू के लिए साउथ मुंबई के एक होटल में बुलाया. शाम के 7 बज रहे थे. होटल की लॉबी में पहुंचकर मैंने आपको फोन किया, आपने कहा आ जाओ. रूम में पहुंची तो वहां डेटिंग जैसा माहौल ज्यादा था, इंटरव्यू का कम. आपने अपने मिनी बार से मुझे ड्रिंक ऑफर किया, मैंने मना कर दिया. आपने वोदका ली, एक छोटे टेबल पर मैं और आप इंटरव्यू के लिए आमने-सामने थे. वहां से मुंबई का मरीन ड्राइव जिसे क्वींस नेकलेस कहते हैं, दिख रहा था. आपने कहा कितना रोमांटिक लग रहा है, आपने हिंदी फिल्म का पुराना गाना सुनाया और मुझसे संगीत पर मेरी रुचि के बारे में पूछने लगे. रात बढ़ती जा रही थी, मुझे घबराहट हो रही थी. कमरे में बिस्तर भी था, आपने कहा यहां आ जाओ, यहां बैठ जाओ, मैंने कहा नहीं मैं कुर्सी पर ही ठीक हूं. उस रात मैं किसी तरह बच गई, आपने मुझे काम दे दिया, मैंने कई महीने आपके साथ काम किया, लेकिन तय कर लिया कभी आपसे रूम में अकेले नहीं मिलूंगी. सालों बाद भी आप नहीं बदले . आपके यहां जो भी नई लड़की काम करने आती थी, आप उसपर अपना अधिकार समझते थे. आप उन्हें प्रभावित करने के लिए गंदी-गंदी तरकीबें अपनाते थे. उनसे कहते थे- मेरी तरफ देखो, पूछते थे क्या तुम्हारी शादी हो गई है, कंधा रगड़ते थे. आप भद्दे फोन कॉल और मैसेज करने में एक्सपर्ट हैं. आप जानते हैं कि कैसे चुटकी काटी जाए. थपथपाया जाए, जकड़ा जाए और हमला किया जाए, आपके खिलाफ बोलने की अब भी भारी कीमत चुकानी पड़ती है. ज्यादातर युवा महिलाएं यह कीमत अदा नहीं कर सकतीं.

काय आहे #MeToo?
महिलांसोबत घडणाऱ्या लैंगिक शोषणाबाबत जगभरात चर्चा सुरु झाली आहे. कधी ना कधी अशाप्रकारच्या प्रसंगांना सामोरे गेलेल्या महिला #MeToo ह्या हॅशटॅगद्वारे त्यांची कहाणी ट्विटरवर शेअर करत आहेत. काही दिवसांपूर्वी #MeToo ट्विटरवर टॉप ट्रेंडमध्ये होते. लाखो महिला या हॅशटॅगशी जोडल्या गेल्या आहेत. नेटिझन्सनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हा हॅशटॅगचा वापरुन प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com