वासनेसाठी मुस्लिम पुरुष पत्नी बदलतात : केशव प्रसाद मौर्य

वृत्तसंस्था
शनिवार, 29 एप्रिल 2017

बहुजन समाज पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे मंत्री पदावर विराजमान झालेले उत्तर प्रदेशमधील मंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी तोंडी तलाकविषयी बोलताना 'वासनेसाठी मुस्लिम पुरुष पत्नी बदलतात' असे वक्तव्य केले आहे.

बस्ती (उत्तर प्रदेश) : बहुजन समाज पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे मंत्री पदावर विराजमान झालेले उत्तर प्रदेशमधील मंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी तोंडी तलाकविषयी बोलताना 'वासनेसाठी मुस्लिम पुरुष पत्नी बदलतात' असे वक्तव्य केले आहे.

शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना मौर्य म्हणाले, "मुस्लिम पुरुष वासना शमविण्यासाठी सातत्याने पत्नी बदलतात. तोंडी तलाकच्या मुद्याबाबत भारतीय जनता पक्ष मुस्लिम महिलांच्या सोबत आहे.' बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यावरही मौर्य यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, "ज्यावेळी मी बहुजन समाज पक्ष सोडला त्यावेळी मायावती म्हणाल्या होत्या की जो पक्ष सोडून जाईल त्याची राजकीय कारकिर्द संपेल. मात्र, राजकीय कारकिर्द त्यांची संपलेली आहे जे मायावती यांच्याजवळच राहिले आहेत.'

कोण आहेत स्वामी प्रसाद मौर्य?
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मौर्य हे कामगार मंत्री आहेत. बहुजन समाज पक्षात असताना ते विरोधी पक्ष नेता होते. मायावती यांचे जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. मात्र उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधी त्यांनी मायावती यांच्यावर टीका करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी भाजपचे सदस्य स्वीकारले. भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. वादग्रस्त वक्तव्यांमुळे मौर्य नेहमीच चर्चेत राहतात. यापूर्वी त्यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना "रिजेक्‍टेड माल' असे संबोधले होते. तर हिंदू देवी-देवतांसंदर्भातही त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

Web Title: bjp minister swami prasad maurya said muslims change their wife to eradicate their lust