
Vinod Tawde: राष्ट्रीय राजकारणात विनोद तावडेंचं वजन वाढलं; पक्षाने सोपवली महत्त्वाची जबाबदारी
विनोद तावडे हे एकेकाळी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिस्पर्धी मानले जायचे. 2019 मध्ये विधान सभेचं पक्षाने तिकीट नाकारल्याने काही काळासाठी ते राजकारणातून बाजूला झाल्याचे बोलले जात होते. मात्र तावडेंनी पक्षात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे.
भाजप नेतृत्वाने तावडेंवर महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. फडणवीस सरकारमध्ये शालेय शिक्षण, वैद्यकीय आणि उच्च तंत्रशिक्षण, क्रीडा, संस्कृती आणि मराठी भाषा अशी महत्त्वाची खाती विनोद तावडे सांभाळली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणी त्यांचे तिकीट कापण्यात आले.
विनोद तावडे यांच्यासाठी हा मोठा धक्का होता पण पक्षाच्या निष्ठावान सैनिकाप्रमाणे त्यांनी भाजपच्या निर्णयाचा आदर करत उमेदवार सुनील राणे यांच्या बाजूने प्रचार केला. त्यानंतर विनोद तावडे यांचं राजकारण संपलं असं सगळ्यांना वाटत होती. मात्र पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.
अनेक राज्यांच्या विधानसभा प्रभारी पदाची जबाबदारी चोख पणे पार पडल्यानंतर. राष्ट्रीय पातळीर पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा विश्वास प्रस्थापित करून. २०२४ च्या लोकसभेसाठी मोठी जबाबदारी मिळवली आहे.
राष्ट्रीय राजकारणात असलेले भाजप नेते विनोद तावडे यांचे राजकीय वजन चांगलेच वाढले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांच्यावर भाजपकडून महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भाजपकडून लोकसभा निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रत्येक राज्याचा आढावा घेऊन रणनीती निश्चित करणार आहे.
ही समिती २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप कोणत्या जागांवर दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता, याचा अभ्यास करणार, अभ्यासाअंती भाजपच्या या समितीकडून संबंधित राज्यातील संघटनात्मक कार्यक्रम, प्रचार प्रसार, नेत्यांचे दौरे, जाहीर कार्यक्रमाचे नियोजनही ही समिती करणार. ही समिती २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार आणि रणनीती आखण्यासाठी काम करणार आहे.
समितीचे निमंत्रक म्हणून विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विनोद तावडे यांच्यावर देण्यात आलेली जबाबदारी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचा त्यांच्यावरील वाढलेल्या विश्वासाचे फळ असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.