भाजप आमदाराचा घरकाम करणाऱ्या महिलेच्या मुलीवर बलात्कार

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

जर मला न्याय मिळाला नाहीतर मी आत्महत्या करणार आहे, असा इशारा पीडितेने दिला आहे. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर मला काही धमक्याही दिल्या जात आहेत.

लखनौ : उत्तरप्रदेशातील भाजपचे आमदार कुशाग्रा सागर यांनी त्यांच्या घरकाम करणाऱ्या महिलेच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. कुशाग्रा सागर हे उत्तरप्रदेशातील बिसौली विधानसभेतून प्रतिनिधित्व करत आहेत. याप्रकरणी कुशाग्रा सागर यांच्याविरोधात बरेली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

जर मला न्याय मिळाला नाहीतर मी आत्महत्या करणार आहे, असा इशारा पीडितेने दिला आहे. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर मला काही धमक्याही दिल्या जात आहेत. तसेच कुशाग्रा सागरचे वडील आणि माजी आमदार योगेंद्र सागर यांनी आपला मुलगा तुझ्याशी लग्न करेल, असे आश्वासनही दिले होते. याशिवाय हे प्रकरण मिटविण्यासाठी मला 20 लाखांची ऑफरही देण्यात आली, असे तिने म्हटले आहे. कुशाग्रा सागर यांनी लग्नाचे आमिष दाखवून माझ्यावर वारंवार बलात्कार केला. मात्र, अद्याप त्यांनी माझ्याशी लग्न केले नाही. 

kushagra sagar

याबाबत वरिष्ठ पोलिस अधीक्षक कलानिधी नैथनी यांनी सांगितले, की आम्ही याप्रकरणाचा तपास सुरु केला असून, यातील आरोपींवर लवकरच कडक कारवाई केली जाईल. 

Web Title: BJP MLA from UP Badaun MLA Kushagra Sagar charged with raping maids minor daughter