Madhya Pradesh
Madhya Pradesh

होय खरंच, आमदार राहतात झोपडीत!

भोपाळ : साधारणपणे राजकीय नेतेमंडळी श्रीमंत असतात, परंतु मध्य प्रदेशात नव्याने निवडून आलेल्या एका भाजप आमदाराकडे राहण्यासाठीही पक्के घर नाही. म्हणूनच त्यांच्या समर्थकांनी पक्के घर बांधण्याचे नियोजन केले आहे. सध्या ते झोपडीप्रमाणेच एका कच्च्या घरात राहतात. 

मध्य प्रदेशातील श्‍योपूर जिल्ह्यातील विजयपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले सीताराम आदिवासी (वय 55) यांची गरीब स्थिती असल्याने त्यांच्या समर्थकांनी पैसे गोळा करून घर बांधण्याची तयारी केली. आपल्या मतदारसंघातील आमदाराने झोपडीत राहू नये, अशी नागरिकांची इच्छा आहे. त्यामुळे सीताराम यांच्यासाठी पक्के घर तयार केले जात आहे. सीताराम यांनी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे मातब्बर नेते रामनिवास रावत यांना पराभूत केले आहे. सीताराम यांची ही तिसरी निवडणूक होय. ते सलग दोनदा पराभूत झाले होते, मात्र तिसऱ्यांदा विजय मिळवला. नोव्हेंबरमध्ये निवडून आलेले सीताराम यांना अद्याप पहिले वेतन मिळालेले नाही. मध्य प्रदेशातील आमदारांना 1 लाख 10 हजाराचे वेतन दिले जाते.

सीताराम यांचे राहणीमान अतिशय साधे आणि खेडेगावातील चालिरितीप्रमाणे आहे. अलीकडच्या दिवसात ते सायंकाळी आपल्या झोपडीबाहेर खाटावर बसून शेकोटी शेकत बसलेले दिसतील, तर सकाळी अंगावर शाल घेत ऊन घेत ग्रामस्थांशी चर्चा करताना दिसतील. सीताराम म्हणतात, की आपल्याकडे पैसा नाही. त्यामुळे कुटुंबीयांसह आपण झोपडीत राहतो. सुरवातीला ते कॉंग्रेसचे सदस्य होते. तेथे त्यांच्या कामाची कदर न झाल्याने ते भाजपमध्ये आले. दोनदा पराभूत झाल्यानंतर तिसऱ्यांदा जिंकले. सीताराम यांनी चांगल्या घरात राहावे, असे समर्थकांना वाटते. म्हणूनच पैसा गोळा करून त्यांच्यासाठी घर बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार मोहीमही सुरू झाली आहे. सीताराम कराहल विकासखंडच्या पिपरानी गावचे रहिवासी होत. या गावात आता त्यांच्यासाठी पक्के घर बांधले जात आहे. या घरासाठी लोकांनी 500 ते 1000 रुपये दिल्याचे ते स्वत: सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com