भाजप आमदाराकडून टोल कर्मचाऱयांना मारहाण

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 एप्रिल 2017

बरेली (उत्तर प्रदेश)- भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार महेंद्र यादव यांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱयांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

यादव हे दिल्लीवरून लखौनकडे परतत होते. राष्ट्रीय महामार्ग 24 वर फतेगंज येथे टोल नाका आहे. या टोल नाक्यावर सोमवारी (ता. 17) सायंकाळी पावणे आठच्या सुमारास त्यांची मोटार आडविण्यात आली होती. यादव यांच्यासोबत असलेल्या दोन मोटारींचा टोल मागितल्याच्या कारणावरून यादव व टोल कर्मचाऱयांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी यादव यांनी टोल कर्मचाऱयांना मारहाण केली. संबंधित व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवरून व्हायरल झाला आहे.

यादव म्हणाले, 'माझी मोटार टोल नाक्यावर आडविण्यात आली होती. आमदारांना टोल माफ असल्याचे सांगितले. त्यांना मोटार सोडून देण्यास सांगितले. परंतु, त्यांनी ऐकले नाही, यामधून आमच्यामध्ये बाचाबाची झाली.'

टोल नाक्यावरील कर्मचाऱयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. यामध्ये आमदार महेंद्र यादव यांचे नाव लिहिण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधिक्षक (ग्रामीण) यमुना प्रसाद यांनी दिली.

Web Title: BJP MLA Mahendra Yadav assaults toll plaza staffer in UP, video goes viral