गोरक्षणासाठी भाजप आमदाराचा राजीनामा 

वृत्तसंस्था
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

'माझ्यासाठी हिंदू धर्म व गोरक्षण हे महत्त्वाचे आहे व त्यानंतर राजकारणाला मी प्राधन्य देतो. गोरक्षेचा मुद्दा हा अनेकदा मी विधानसभेत मांडला, पण मला त्याबाबत कोणतेही समर्थन मिळाले नाही व त्यासाठी मी राजीनामा देत आहे. मी व माझे गोरक्षक सहकारी आता रस्त्यावर उतरू व गायींची कत्तल थांबवू,' असेही सिंग यांनी सांगितले. 

हैदराबाद : तेलंगणातील भारतीय जनता पक्षाचे आमदार टी. राजा सिंह यांनी, भारतीय जनता पक्ष हा गोरक्षेसाठी पाठिंबा दर्शवत नाही, असा आरोप करत रविवारी (ता. 13) तेलंगणाच्या भाजप प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला. 

'हिंदू धर्म व गोरक्षण हे माझ्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत व त्यानंतर मी राजकारणाला प्राधन्य देतो. गोरक्षेचा मुद्दा हा अनेकदा मी विधानसभेत मांडला, पण मला त्याबाबत कोणतेही समर्थन मिळाले नाही व त्यासाठी मी राजीनामा देत आहे. मी व माझे गोरक्षक सहकारी आता रस्त्यावर उतरू व गायींची कत्तल थांबवू,' असेही सिंग यांनी सांगितले. 

सिंह हे हैदराबादमधील गोशमहल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी, सोशल मीडियावर तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष के. लक्ष्मण यांच्याकडे राजीनामा पाठवत आहे, असा व्हिडीओ प्रसारित केला आहे. सिंह यांच्यावर या आधीही वादग्रस्त वक्तव्ये केल्याने गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 'गोरक्षेसाठी आम्ही करो या मरोचा अबलंब करू, पण गायींची कत्तल थांबवू, तसेच भाजपला मी गोरक्षक असल्याने काही त्रास होऊ नये यासाठी मी आमदारपदाचा राजीनामा देत आहे' असे सिंह यांनी सांगितले. 

 

Web Title: bjp MLA resigns for no support from party for goraksha