भाजप आमदारावर माझं लयं प्रेम... नाही सोडणार त्यांना...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 जून 2018

बंगळूर : भारतीय जनता पक्षाच्या आमदारावर माझं लय प्रेम आहे, जिवंत असेपर्यंत त्यांना सोडणार नाही, असे म्हणत एका कथित प्रेयसीने भाजप आमदाराच्या घरी पोहचली अन् मोठा गोंधळ झाला. कर्नाटकमध्ये सध्या ते भाजप आमदार चांगलेच चर्चेत आले आहेत.

बंगळूर : भारतीय जनता पक्षाच्या आमदारावर माझं लय प्रेम आहे, जिवंत असेपर्यंत त्यांना सोडणार नाही, असे म्हणत एका कथित प्रेयसीने भाजप आमदाराच्या घरी पोहचली अन् मोठा गोंधळ झाला. कर्नाटकमध्ये सध्या ते भाजप आमदार चांगलेच चर्चेत आले आहेत.

म्हैसूरमधील कृष्णाराजा मतदारसंघातील भाजपचे आमदार एस. ए. रामदास यांच्या कार्यालयात ही प्रेयसी घुसली. रामदास यांचे निवासस्थानीच कार्यालय आहे. या महिलेने आपली ओळख प्रेमाकुमारी अशी सांगितली. आमदार रामदास यांना भेटण्यासाठी ही महिला अडून बसली होती. आमदार कार्यालयात नव्हते. रामदास माझे असून मला त्यांना काही झाले तरी मला भेटायचं आहे, असे ती वारंवार बोलत होती. परंतु, आमदार कार्यालयात नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानंतर ती नाराज झाली अन् तिने जोरदार गोंधळ घालायला सुरवात केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोपही तिने केला आहे.

"जिवंत असेपर्यंत मी रामदास यांना सोडणार नाही. माझं रामदास यांच्यावर लयं प्रेम आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मी त्यांच्याविरोधातील उमेदवारी अर्जही मागे घेतला होता. मी सातत्याने त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते माझा कॉलही उचलत नाहीत," असे ही महिला बोलत होती. दुसरीकडे आमदारांच्या निकटवर्तीयाच्या सांगितले की, 'संबंधित महिला आमदार रामदास यांना 'ब्लॅकमेल' करण्याचा प्रयत्न करत आहे. रामदास यांनी आपल्याशी विवाह केल्याचा दावा करत आहे, पण तिच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. ती केवळ पैसे उकळण्याच्या प्रयत्नात आहे.'

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार रामदास यांच्या कथित एक्स गर्लफ्रेण्डने त्यांच्याचविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने ते चर्चेत आले होते. मात्र, महिलेने निवडणूक लढवली नाही. पण रामदास यांनी निवडणूक न लढवण्यासाठी आपल्याला दोन कोटी रुपये दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. कर्नाटकमध्ये भाजपचा एक आमदार त्याच्या राजकीय कामांमुळे नाही तर कथित एक्स गर्लफ्रेण्डमुळे वादात आणी चर्चेत आले आहेत.

आमदाराच्या प्रकरणानंतर संघाच्या शाखेमध्ये बहुतेक हेच शिकवले जाते, असा टोला काँग्रसने लगावला आहे.

Web Title: bjp mla s a ramdas ex girlfriend stroms his home and creates ruckus