भाजप आमदार म्हणतात, 'मायावती ना पुरूष ना महिला'

वृत्तसंस्था
रविवार, 20 जानेवारी 2019

''जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण झाले तेव्हा महाभारत घडले. समाजवादी पक्षाने मायावतींचे वस्त्रहरण केले. पण त्यानंतरही सत्तेच्या मोहापायी त्यांनी सपसोबत आघाडी करून महिलांच्या प्रतिष्ठेला काळीमा फासला आहे. मायावती या ना पुरुष दिसतात ना महिला, असे आक्षेपार्ह वक्तव्य भाजपच्या आमदार साधना सिंह यांनी केले आहे.

लखनौ : ''जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण झाले तेव्हा महाभारत घडले. समाजवादी पक्षाने मायावतींचे वस्त्रहरण केले. पण त्यानंतरही सत्तेच्या मोहापायी त्यांनी सपसोबत आघाडी करून महिलांच्या प्रतिष्ठेला काळीमा फासला आहे. मायावती या ना पुरुष दिसतात ना महिला, असे आक्षेपार्ह वक्तव्य भाजपच्या आमदार साधना सिंह यांनी केले आहे.

चंदोलीमधील मुगलसराय मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार असलेल्या साधना सिंह यांनी किसान कुंभ अभियान कार्यक्रमात बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यावर टीका केली. लोकसभा निवडणुक जवळ येत आहे तशा या तापलेल्या राजकीय वातावरणामध्ये नेत्यांचा तोलही ढळू लागल्याचे यावरून दिसून येत आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून एकमेकांविरोधात आक्षेपार्ह टीका होत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण आणखीनच तापत आहे.

या टीकेविरोधात बसपने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या नेत्यांचे मानसिक संतुलन ढळले आहे, असे बसप नेते सतीशचंद्र मिश्रा यांनी म्हटले आहे. सप-बसप आघाडी झाल्यामुळेच भाजप नेत्यांचे असे मानसिक संतुलन ढळले आहे, असेही मिश्रा म्हणाले. दरम्यान, साधना सिंह यांनी ही टीका केली त्यावेळी भाजपाचे उत्तर प्रदेशातील महामंत्री पंकज सिंह हे सुद्धा उपस्थित होते.

Web Title: BJP MLA Sadhana Singh sparks outrage says Mayawati neither man nor woman