'भारत 2024 पर्यंत होणार हिंदू राष्ट्र'

वृत्तसंस्था
सोमवार, 15 जानेवारी 2018

राहुल गांधी भारतीय विचारधारेचे प्रतिनिधित्व कधीच करू शकत नाहीत. त्यांच्यात दोन इटालियन आणि भारतीय मूल्ये आहेत. ते एक जर्सी व्यक्तिमत्व असून, त्यांच्यात विविध संस्कृती आहेत. त्यामुळे ते भारताचे दुःख कधीच समजू शकत नाहीत.

बलिया : भारत 2014 पर्यंत हिंदू राष्ट्र होणार असून, हिंदू संस्कृती स्वीकारणारे मुस्लिमच या देशात राहू शकतात, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार सुरेंद्रसिंह यांनी केले आहे.

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील बैरिया येथील आमदार असलेले सुरेंद्रसिंह यांनी म्हटले आहे, ''जे नागरिक हिंदू संस्कृती स्वीकारणार नाहीत, ते दुसऱ्या देशात स्थलांतर करण्यासाठी स्वतंत्र आहेत. भारत 2014 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली हिंदू राष्ट्र बनेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर काम करत आहे. संघाच्या स्थापनेला 2014 मध्ये 100 वर्षे होत आहेत. त्यामुळे त्यावेळी नक्कीच भारत हिंदू राष्ट्र झालेले असेल. सध्या देशात खूप कमी मुस्लिम नागरिक आहेत, ज्यांच्यात भारताबद्दल राष्ट्रभक्ती आहे.''

सुरेंद्रसिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, की राहुल गांधी भारतीय विचारधारेचे प्रतिनिधित्व कधीच करू शकत नाहीत. त्यांच्यात दोन इटालियन आणि भारतीय मूल्ये आहेत. ते एक जर्सी व्यक्तिमत्व असून, त्यांच्यात विविध संस्कृती आहेत. त्यामुळे ते भारताचे दुःख कधीच समजू शकत नाहीत.

Web Title: BJP mla said India will become hindu nation in coming six years