भाजप आमदाराच्या मुलाने लगावली पोलिस अधिकाऱयाच्या कानशिलात

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 एप्रिल 2019

मी आमदाराचा मुलगा आहे. त्यामुळे हे प्रकरण महागात पडेल, अशी धमकी देत राहुलने पोलिस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली.

झाशी (उत्तर प्रदेश): भाजप आमदार जवाहर राजपूत यांच्या मुलाने पोलिस अधिकाऱ्याला कानशिलात लगावल्याची घटना येथे घडली. पोलिसांनी राहुल राजपूतला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राहुल राजपुत हा क्रमांक नसलेल्या मोटारीमधून रात्री प्रवास करत होता. गुरसराई भागातील मोदी चौकात पोलिसांनी चौकशीसाठी मोटार थांबवली. नियमित तपासणीचा भाग म्हणून त्यांच्याकडे वाहनाची कागदपत्रांची मागणी केली. मी आमदाराचा मुलगा आहे. त्यामुळे हे प्रकरण महागात पडेल, अशी धमकी देत राहुलने पोलिस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली.

दरम्यान, राहुलला ताब्यात घेण्यात आले असून, चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या घटनेची माहिती समजताच आमदार जवाहर राजपूत त्यांच्या समर्थकांसह पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी राहुल यांना मारहाण केल्याचा आरोप केला. माझ्या मुलाला त्रास देणाऱ्या पोलिसाविराधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. 'अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. हा प्रकार नेमका कशामुळे घडला याची चौकशी ते करत आहेत,' अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी दिली.

Web Title: Bjp mla son slaps police officer in uttar pradesh