भाजप आमदार टी राजा यांना अटक, पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप आमदार टी राजा यांना अटक, पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप

भाजप आमदार टी राजा यांना अटक, पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप

तेलंगणाचे भाजप आमदार टी राजा यांना अटक करण्यात आली आहे. प्रेषित मुहम्मद यांच्यावर कथित टिप्पणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर हैदराबादमध्ये रात्री उशिरा अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली आहेत. यानंतर पोलिसांनी टी राजाविरोधात अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.

डीसीपी पी साई चैतन्य म्हणाले की, काल रात्री दक्षिण झोन डीसीपी कार्यालयात मोठ्या संख्येने लोकांनी निदर्शने केली होती. भाजप आमदाराने एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असे लोकांचे म्हणणे आहे. यानंतर त्याच्यावर आयपीसीच्या अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा: भाजप आमदार टी राजा यांची पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी

भाजप आमदार टी राजा सिंह यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओबाबत त्याने प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल कथित टिप्पणी केली होती. त्याची पोस्ट व्हायरल झाली आणि बघता बघता लोकांनी रात्री उशिरा डबीरपुरा, भवानी नगर, मिचोक, रेनबाजार येथील पोलीस स्टेशन गाठले आणि विरोध सुरू केला.

यापूर्वी टी राजा सिंह यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकीलाही धमकी दिली होती. त्याचा शो रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली होती. शुक्रवारी, टी राजा मुनव्वर फारुकीच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला प्रतिबंधात्मक ताब्यात घेतले.

Web Title: Bjp Mla T Raja Arrested Accused Of Making Controversial Statement On Prophet Mohammad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpMLA