'गांधीजींचा स्वातंत्र्यलढा हा ड्रामा!'; भाजप खासदाराची मुक्ताफळे

वृत्तसंस्था
Monday, 3 February 2020

अनंतकुमार हेगडे यांनी तर थेट महात्मा गांधींबाबतच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी गांधींच्या स्वातंत्र्य लढ्यावरच शंका उपस्थित केल्या आहेत. असं काय वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री हेगडे यांनी केलं, ज्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत....

बंगळूर : भारतीय जनता पक्षातील नेते हे नेहमीच काही ना वादग्रस्त वक्तव्य करताना दिसतात. कर्नाटकातील खासदार अनंतकुमार हेगडे यांनी तर थेट महात्मा गांधींबाबतच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी गांधींच्या स्वातंत्र्य लढ्यावरच शंका उपस्थित केल्या आहेत. असं काय वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री हेगडे यांनी केलं, ज्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत....

दिल्लीत जामियाबाहेर पुन्हा गोळीबार; तिसरी घटना

Image result for anantkumar hegde

माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे बंगळूर येथील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, 'गांधीजींच्या नेतृत्त्वात लढवला गेलेला स्वातंत्र्यलढा हा नाटकी होता. हा स्वातंत्र्यलढा ब्रिटीश सरकारच्या पाठींब्याने व संमतीने रचला गेला होता. स्वातंत्र्याची ही खरीखुरी लढाई नव्हती, तर परस्पर संमतीने घडवून आणण्यात आलेला हा लढा होता. या तथाकथित नेते मंडळींनी कधीच पोलिसांची लाठ खाल्ली नाही. यांची आंदोलने नाटकी होती. इंग्रजांनी यांच्या आंदोलनांमुळे किंवा सत्याग्रहांमुळे देश सोडला नाही, तर निराश होऊन इंग्रज परतले. पण ज्यांनी नाटकं केली असेच लोक आमच्या देशात महात्मा बनले.' असे वादग्रस्त वक्तव्य हेगडे यांनी केले आहे. यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हेगडे उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. सावरकरांवरील राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेचा वाद संपतच होता, इतक्यात गांधीवरील टीकेचा वाद आता पुन्हा सुरू होईल, असे चित्र आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP Anantkumar Hegde speaks controversial statement on Mahatma Gandhi