जवानाच्या मुलीची तुलना दाऊदशी- भाजप नेत्याचे ट्विट

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

माझे राष्ट्रप्रेम सिद्ध करण्याची गरज नाही, असे गुरमेहेर कौर हिने म्हटले आहे. 

म्हैसूर- येथील भाजपचे खासदार प्रताप सिंह यांनी कारगील युद्धातील हुतात्मा जवानाची मुलगी गुरमेहेर कौर हिची तुलना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी केली आहे. 

दिल्ली विद्यापीठाच्या रामजस कॉलेजमधील हिंसक दंग्यांबद्दल सोशल मीडियावरून गुरमेहेर कौर हिने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर (ABVP) जोरदार टीका केली आहे. 

भाजपचे कोडगू लोकसभा मतदारसंघातील खासदार प्रताप सिंह यांनी ट्विटमध्ये गुरमेहेर हिची दाऊदशी तुलना करताना म्हटले आहे की, 'दाऊद इब्राहिम यानेही आपल्या राष्ट्रविरोधी भूमिकेचे समर्थन करताना वडिलांच्या नावाच्या कुबड्या वापरल्या नाहीत.'
मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटाचा प्रमुख सूत्रधार असलेला दाऊद इब्राहिम हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील 'मोस्ट वाँटेड' दहशतवादी आहे. 

प्रताप सिंह यांनी ट्विटरवर गुरमेहेर आणि दाऊद यांचे फोटो एकत्रित करून शेअर केले आहेत. त्यावर सैनिकाची मुलगी (गुरमेहेर) आणि पोलिसाचा मुलगा (दाऊद) असे शीर्षक देऊन वरीलप्रमाणे दाऊदशी तिची तुलना केली आहे. 

#StudentsAgainstABVP हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आला होता. 
'मी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी असून, मी ABVP ला घाबरत नाही. मी एकटी नाही. भारतातील प्रत्येक विद्यार्थी माझ्यासोबत आहे,' असे गुरमेहेरने म्हटले आहे. 
 

Web Title: BJP MP compares Kargil martyr's daughter with Dawood

फोटो गॅलरी