'युगपुरुष मोदींना भारतरत्न पुरस्कार द्या'

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचे आणि विभाजनाचे विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर भाजप खासदाराने युगपुरुष मोदींना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.

तर, मध्य प्रदेशच्या रतलाम मतदारसंघाचे खासदार गुमान सिंह यांनी लोकसभेत जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरपूर कौतुक केले. त्यांनी सांगितले की, काश्मीरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कोट्यवधी भारतीयांना आनंद झाला आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न दिला पाहिजे, अशी मागणी सभागृहाच्या शुन्य प्रहारात करण्यात आली. 

मोदींना आतापर्यंत जगभरातील अनेक देशांनी प्रतिष्ठीत पुरस्कार दिले आहेत. त्यात संयुक्त अरब अमिरातकडून जायद मेडल, फिलिप कोटलर प्रेसिडेंशल अवार्ड आणि प्रतिष्ठीत सीओल पुरस्कारांचा समावेश आहे. तसेच रशियातील सर्वोच्च सम्मान ऑर्डर ऑफ सेंट एंड्र्यू द एपोस्टलने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आता भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देण्याची मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com