प्रभू रामचंद्रांना थंडी वाजतेय; त्यांना आता घर द्या!

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुपीक कल्पना असलेल्या पंतप्रधान आवास योजनेतून अयोध्येत प्रत्यक्ष श्रीरामचंद्रांना एका घराचे वाटप करावे, अशी अजब मागणी भाजपमधूनच पुढे आली आहे. उत्तर प्रदेशातील घोसीचे भाजप खासदार हरिनारायण राजभर यांनी ही मागणी करणारे पत्र फैजाबादच्या (अयोध्या) जिल्हाधिकाऱ्यांना धाडले आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुपीक कल्पना असलेल्या पंतप्रधान आवास योजनेतून अयोध्येत प्रत्यक्ष श्रीरामचंद्रांना एका घराचे वाटप करावे, अशी अजब मागणी भाजपमधूनच पुढे आली आहे. उत्तर प्रदेशातील घोसीचे भाजप खासदार हरिनारायण राजभर यांनी ही मागणी करणारे पत्र फैजाबादच्या (अयोध्या) जिल्हाधिकाऱ्यांना धाडले आहे. 

भगवान श्रीराम अयोध्येतील आपल्याच जन्मभूमीवर एका तंबूत राहात आहेत. मी नुकतेच तेथे जाऊन रामाचे दर्शन घेतले तेव्हा पाहिले, की त्या तंबूत उघड्यावर रामलल्ला थंडीने काकडले आहेत. पावसाळ्यात ते भिजतही असतील. त्यांचे भव्य मंदिर निर्माण होईपर्यंत त्यांना पंतप्रधानांच्या योजनेतून किमान घर द्यावे, निवारा द्यावा, असे राजभर यांनी "सकाळ'ला सांगितले.

याच राजभर यांनी मागच्या आठवड्यातील भाजप संसदीय बैठकीत राममंदिर कोव्हा होणार असा सवाल मोदी-शहा यांच्या अनुपस्थितीत पक्षनेतृत्वाला विचारला होता.

जनतेचीच भावना मी बोलून दाखविली आहे. रामलल्ला अशी किती वर्षे उघड्यावर तंबूत राहणार?

आता पुढचे पाऊल टाकून त्यांनी अयोध्येच्या जिल्हाधिकाऱ्यांनाच राममंदिराबाबत पत्र लिहिले आहे. भाजपमधील सध्याची परिस्थिती पहाता तुम्हाला "झापण्यात' येईल अशी भीती तुम्हाला वाटत नाही का, किंवा याबाबत तुम्ही पक्षनेतृत्वाशी संपर्क साधलात का, असे विचारता राजभर म्हणाले, की मी काही वेगळी मागणी केलेली नाही.

जनतेचीच भावना मी बोलून दाखविली आहे. रामलल्ला अशी किती वर्षे उघड्यावर तंबूत राहणार? न्यायालयीन सुनावणीचा खेळ तर लांबतच चालला आहे. मंदिर निर्माण होणारच; पण ते कधी याचा कालावधी कोणालाही माहिती नाही. अशा स्थितीत रामलल्लांना सरकारी निवासस्थान मिळाले तर ते त्यात निवांत तरी राहतील. 

"आधार'ची गरज काय? 
पंतप्रधान आवास योजना किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार कार्ड मागितले जाते. रामांकडे ते असेल असे वाटते का, या प्रश्‍नावर राजभर म्हणाले, की रामप्रभू त्रेतायुगात होऊन गेले, ते स्वतःच भारतीय उपखंडातील सर्वांचा आधार आहेत, त्यांना "आधार'ची गरजच काय? जिल्हाधिकारी रामप्रभूंसाठी या योजनेतून निश्‍चित घराचे वाटप करतील असा मला विश्‍वास वाटतो.

रामप्रभू त्रेतायुगात होऊन गेले, ते स्वतःच भारतीय उपखंडातील सर्वांचा आधार आहेत, त्यांना "आधार'ची गरजच काय?

Web Title: BJP MP demands house to be allocated for Prabhu Ramchandra