Nirahua : ...तर आम्ही चीनच्या सैन्याला पळवून-पळवून मारू; भाजप खासदार निरहुआ यांचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp mp dinesh lal yadav

Nirahua : ...तर आम्ही चीनच्या सैन्याला पळवून-पळवून मारू; भाजप खासदार निरहुआ यांचा दावा

नवी दिल्ली - आझमगडचे भाजप खासदार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ यांनी मंगळवारी लोकसभेत लष्करात अहिर रेजिमेंट स्थापन करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, अहीर समाजाची रेजीमेंट बनविण्याची मागणी सहाजिक आहे. कोणत्याही भागाचा, जाती, धर्माच्या सेनेतील योगदानानंतर त्या धर्माची किंवा जातीची रेजिमेंट बविण्यात येते. अहीर रेजिमेंट बनविल्यास आमचे लोक चीनच्या सैन्याला पळवून पळवून मारतील, असा दावा भाजप खासदार निरहुआ यांनी केला. (bjp mp dinesh lal yadav news in Marathi)

हेही वाचा: Uddhav Thackeray : शिवसेनेच्या 'धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठी अपडेट; दिल्ली उच्च न्यायालयाने...

निरहुआ पुढं म्हणाले की, राजपूत रेजिमेंट, शीख रेजिमेंट असल्यासारखी ही रेजिमेंट तयार करण्याची गरज आहे. भारतात अहिर समाजाचे २६ कोटी लोक आहेत. लष्करातही आपल्या समाजातील लोक मोठे योगदान देत असून ते १२ टक्के आहेत. जेव्हा या समाजातील लोकांवर देशासाठी सर्वोच्च त्याग करण्याची वेळ आली, तेव्हा ते कधीही मागे फिरले नाहीत. मग ते स्वातंत्र्यलढा असो वा १९७१चे युद्ध असो, कारगिल युद्ध असो... मग त्यांच्यासाठी स्वतंत्र रेजिमेंट का तयार करू नये? असा प्रश्नही निरहुआ यांनी उपस्थित केला.

हेही वाचा: Birendra Saraf : बिरेंद्र सराफ राज्याचे नवे महाधिवक्ता; राज्यपालांची मोहर

दरम्यान हा निर्णय घेतल्याने सैन्याच्या प्रतिमेला धक्का लागणार असेल तर सैन्यात सध्या जातीच्या नावाने काढण्यात आलेल्या सर्व रेजिमेंट हटविण्यात याव्यात. त्यांच्याजागी केवळ हिंदुस्थान रेजिमेंट बनवा. मात्र वेगवेगळ्या जातीच्या रेजिमेंट ठेवणार असाल, तर आमच्या अहीर समाजाची रेजिमेंट बनवा, अशी मागणी निरहुआ यांनी केली. ज्यामुळे समाजाचे मनोबल वाढेल, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :BjpArmy