भाजप खासदाराला जीवे मारण्याची धमकी

वृत्तसंस्था
शनिवार, 21 डिसेंबर 2019

- सुरक्षेत वाढ करण्याची केली मागणी.

नवी दिल्ली : माजी क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला आहे. गंभीर यांना हा फोन आल्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार पोलिस उपायुक्तांकडे केली आहे. त्यामध्ये त्यांनी स्वत: आणि कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी या तक्रारीत केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गौतम गंभीर यांना धमकी देणारा फोन कॉल आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून आला आहे. त्यानंतर गंभीर यांनी शहादराचे पोलिस उपायुक्तांना पत्र लिहून याबाबत तक्रार केली आहे. गौतम गंभीर हे पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. त्यांना जीवे मारण्याची धमकी देणार फोन आंतरराष्ट्रीय क्रमांक +7 (400) 043 वरून  आला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

Image result for gautam

आमची 40 दिवसांची मोहिम यशस्वी झाली : संजय राऊत

आता माझ्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणीही त्यांनी या पत्रात केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP gautam gambhir Kill threats on phone by international number