भाजप खासदार 'हनी ट्रॅप' प्रकरण; महिलेला अटक

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

मला बेशुद्ध करून आपत्तीजनक फोटो काढण्यात आले. त्यानंतर माझ्याकडून पैसे मिळविण्यासाठी ब्लॅकमेल करण्यात येत आहे. ही महिला माझ्याकडे मदतीसाठी आली होती. चहामधून तिने मला बेशुद्धीचे औषध देऊन हे कृत्य केले.

नवी दिल्ली - गुजरातमधील भाजपचे खासदार के. सी. पटेल यांना 'हनी ट्रॅप'च्या जाळ्यात अडकवून पाच कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या महिलेला पोलिसांना अटक केली आहे.

गुजरातमधील वलसाड येथील खासदार पटेल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या महिलेला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील तिच्या घरातून तिला अटक करण्यात आली. पोलिसांकडून तिची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणानंतर दिल्ली पोलिसांनी हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढणाऱ्या गँगचे रॅकेट उघडकीस आणले होते. या गँगची प्रमुख महिला असून, ती श्रीमंत व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढून घेत होती.

खासदार पटेल यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते, की मला बेशुद्ध करून आपत्तीजनक फोटो काढण्यात आले. त्यानंतर माझ्याकडून पैसे मिळविण्यासाठी ब्लॅकमेल करण्यात येत आहे. ही महिला माझ्याकडे मदतीसाठी आली होती. चहामधून तिने मला बेशुद्धीचे औषध देऊन हे कृत्य केले. माझ्यावर चुकीचे आरोप लावण्यात आले होते. कायद्यावर माझा विश्वास आहे. तपासात मी पूर्ण सहकार्य करेल.

Web Title: BJP MP honey-trap case: Woman arrested