10 कोटी हिंदूंना बौद्ध बनवण्याचं 'आप'चं लक्ष्य; भाजपचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aap

10 कोटी हिंदूंना बौद्ध बनवण्याचं 'आप'चं लक्ष्य; भाजपचा आरोप

भाजपने दिल्ली सरकारमधील समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्यावर हिंदू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. गैतम एका कथित धर्मांतर कार्यक्रमात सहभागी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने गौतम यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी राजेंद्र पाल गौतम यांच्या अरोप केला आहे की, ऑक्टोबर 2025 पर्यंत 10 कोटी हिंदूंना बौद्ध अनुयायी बनवण्याचे लक्ष्य 'आप'ने ठेवले आहे.

भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी राजेंद्र गौतम यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट करत म्हटले की, "अरविंद केजरीवाल तुमचे मंत्री राजेंद्र पाल यांनी ऑक्टोबर 2025 पर्यंत 10 कोटी हिंदूंचे धर्मांतर करण्याचे लक्ष ठेवले आहे. हे लक्ष्य तुमच्या सांगण्यावरून आहे की विदेशी एजन्सींच्या इशाऱ्यावर 'आप' आमच्या सनातन धर्मावर हल्ला करत आहे.

हेही वाचा: Bharat Jodo: शंभर दिवस, १२३९ गावं, १३ नगरपालिका; सतेज पाटलांचा कोल्हापुरात मोठा प्लॅन

दिल्लीतील आप सरकारचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ते धर्मांतराशी संबंधित एका कार्यक्रमात सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शेकडो लोक भगवान बुद्धांच्या शिकवणींचे पालन करण्याची आणि हिंदू धर्म सोडण्याची शपथ घेताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर गौतम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत, त्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे.