भाजप खासदाराकडून राहुल गांधींचा उल्लेख 'मंदबुद्धी'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 जून 2018

''राहुल गांधी यांना पाहून मला आश्चर्य वाटत आहे. ते एका मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. मात्र, त्यांना अजून काही गोष्टी माहिती नाहीत. वयाची चाळिशी उलटून गेल्यावरही राहुल त्या गोष्टी समजून घेत आहेत. अशा माणसाला मंदबुद्धीच म्हणता येईल''.

- सरोज पांडे, भाजप खासदार

रायपूर : काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. त्यानंतर आता भाजप खासदार सरोज पांडे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली. सरोज पांडे यांनी राहुल गांधींवर टीका करताना राहुल गांधींना 'मंदबुद्धी' असे म्हटले आहे.

rahul gandhi

सरोज पांडे या भाजपच्या राष्ट्रीय सचिव असून, छत्तीसगडमधून त्या राज्यसभेवर गेल्या आहेत. मार्च महिन्यात झालेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या लेखराम साहू यांचा पराभव केला. राहुल गांधींवर टीका करताना सरोज पांडे म्हणाल्या, ''राहुल गांधी यांना पाहून मला आश्चर्य वाटत आहे. ते एका मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. मात्र, त्यांना अजून काही गोष्टी माहिती नाहीत. वयाची चाळिशी उलटून गेल्यावरही राहुल त्या गोष्टी समजून घेत आहेत. अशा माणसाला मंदबुद्धीच म्हणता येईल''.

दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारच्या विविध धोरणांवर राहुल गांधी यांनी टीका केली होती. त्यानंतर आता सरोज यांनी राहुल गांधींचा उल्लेख मंदबुद्धी असा करत नवा वाद ओढवून घेतला आहे.

Web Title: BJP MP Saroj Pandey Criticizes Congress President Rahul Gandhi