रामाने बनवले हनुमानला गुलाम : भाजप खासदार

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

नवी दिल्लीः राम हे मनुवादी आणि हनुमान हे मनुवादी लोकांचे गुलाम होते. जर ते दलित नव्हते तर त्यांना मनुष्य का बनवले नाही? त्यांना वानरच का बनवले? त्यांचा चेहरा काळा का ठेवला. हनुमान दलित होते म्हणून त्यांना अपमानित करण्यात आले होते, असे भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा सदस्य सावित्रीबाई फुले यांनी म्हटले आहे.

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या सावित्रीबाई फुले या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. फुले म्हणाल्या, 'भगवान राममध्ये जर शक्ती असती तर अयोध्येत तेंव्हाच मंदिर उभारले असते. राम हे मनुवादी आणि हनुमान हे मनुवादी लोकांचे गुलाम होते. जर ते दलित नव्हते तर त्यांना मनुष्य का बनवले नाही? त्यांना वानरच का बनवले? त्यांचा चेहरा काळा का ठेवला..? याचे उत्तर त्यांनीच दिले. ते दलित होते, म्हणूनच त्यांना तसे केले. दलित आणि मागासांना वानर आणि रक्षक म्हटले जाते. हनुमान एक मनुष्य होते. पण त्यांना वानर बनवण्यात आले. हे सर्व भगवान रामांनी केले. हनुमान दलित होते म्हणून त्यांना अपमानित करण्यात आले होते. दलितांना मनुष्य समजले जात नव्हते.'

'देशाला मंदिराची गरज नाही. मंदिर उभारल्यामुळे दलित आणि मागासांच्या बेरोजगारीचा मुद्दा सुटणार आहे का? मंदिर उभारल्याचा फायदा देशात अवघा 3 टक्के असलेल्या ब्राह्मणांनाच होईल. देशात मंदिरे व पुतळे उभारण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. हेच पैसे जर गरिंबासाठी खर्च केले तर नक्कीच गरिबी दूर होईल. निवडणूका जवळ आल्यामुळेच राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला जात आहे,' असेही फुले म्हणाल्या.

Web Title: BJP MP Savitribai Phule makes CONTROVERSIAL statement calls Lord Ram manuvadi