भाजप 2 लोकांचा पक्ष- खासदार शत्रुघ्न सिन्हा

वृत्तसंस्था
सोमवार, 21 मे 2018

पक्ष नेहमीच एखाद्या व्यक्तीपेक्षा मोठा असतो आणि कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा देश हा मोठा असतो. माजी पंतप्रधान अटलजींच्या उपस्थितीत मी या पक्षात प्रवेश केला होता. भारतीय जनता पक्ष आता नरेंद्र मोदींचा पक्ष बनला आहे, असे सिन्हा म्हणाले.

चंदिगढ- कर्नाटकातील राजकीय नाट्यानंतर भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी-शहा यांच्यावर पुन्हा एकदा टिका केली आहे. भाजपमध्ये पक्षांतर्गत लोकशाही संपुष्टात आली असुन सध्या हा दोन लोकांचा पक्ष बनलेला आहे, असे वक्तव्य त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले. 

कर्नाटक निवडणुक निकाल आणि त्यानंतरच्या घटना यावरुन सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष्य केले. पक्षानेच आपल्याकडे दुर्लक्ष केले, दिल्लीतील महानगरपालिकांच्या निवडणुका असतील किंवा कर्नाटक विधानसभा निवडणुक मला बोलावण्यात आले नाही. दुसरीकडे कोठेही जाण्याचा मला पर्याय होता पण मी गेलो नाही. खरे बोलणे हे जर पक्षाच्या कार्यपद्धतीविरोधात असेल तर मी बंडखोर आहे असेही ते म्हणाले.

पक्ष नेहमीच एखाद्या व्यक्तीपेक्षा मोठा असतो आणि कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा देश हा मोठा असतो. माजी पंतप्रधान अटलजींच्या उपस्थितीत मी या पक्षात प्रवेश केला होता. भारतीय जनता पक्ष आता नरेंद्र मोदींचा पक्ष बनला आहे, असे सिन्हा म्हणाले.

नोटाबंदी आणि जीएसटी वरुनही त्यांनी सरकारवर टिका केली. नोटाबंदी व जीएसटी मुळे सामान्य जनतेला खुप सोसावे लागले. चलनाच्या तुटवड्यामुळे लोकांना रांगेत उभे राहावे लागले. छोट्या व्यावसायिकांना व्यवहार करता आले नाही तर जीएसटीने सामान्य जनतेचा कणाच मोडला अशी टिका त्यांनी केली.
 

Web Title: BJP MP Shatrughan Sinha fires at Modi-Shah duo, calls saffron party a 2-man show