Sunny Deol Corona: सनी देओलला कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

64 वर्षीय सनी देओल यांच्यावर काही दिवसांपूर्वीच मुंबईत खांद्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर विश्रांतीसाठी ते काही दिवसांपूर्वी मनाली येथील फॉर्म हाऊसवर आले आहेत.

सिमला- अभिनेता तथा पंजाबमधील गुरदासपूरचे भाजप खासदार सनी देओल यांना कोरोनाची लागण झाली आहे. हिमाचल प्रदेशच्या आरोग्य सचिवांनी याची माहिती दिली आहे. सनी देओल हिमाचल प्रदेशच्या खासगी दौऱ्यावर आले असल्याची माहिती आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कुल्लू जिल्ह्यातील मनाली येथील एका फॉर्म हाऊसवर राहत आहेत. 

64 वर्षीय सनी देओल यांच्यावर काही दिवसांपूर्वीच मुंबईत खांद्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर विश्रांतीसाठी ते काही दिवसांपूर्वी मनाली येथील फॉर्म हाऊसवर आले आहेत. याचदरम्यान 3 डिसेंबर रोजी सनी देओल आपल्या एका मित्राबरोबर मुंबईला परतणार होते. परंतु, आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे हिमाचल प्रदेशच्या आरोग्य सचिवांनी सांगितले आहे. खांद्यावरील शस्त्रक्रियेनंतर सनी देओल हिमाचल प्रदेशमध्ये आपल्या कुटुंबीयासमवेत आले होते. कुटुंबातील काही सदस्य नुकतेच मुंबईत परतले होते. आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याने ते डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. 

हेही वाचा- ढिंग टांग : एक दरखास्त में सब बरखास्त! (अर्थात भाग्यनगरची मोहीम)

नुकताच केली 'अपने 2' ची घोषणा

हेही वाचा- कोरोना बाधितांना अस्पृश्‍यांसारखी वागणूक; सर्वोच्च न्यायालयाची खंत​

2007 मध्ये धर्मेंद, सनी देओल आणि बॉबी देओल अभिनित अपने चित्रपट रिलीज झाला होता. त्यावेळी हा चित्रपटा बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला होता. नुकताच देओल कुटुंबीयांनी या चित्रपटाचा सीक्वेल येणार असल्याचे जाहीर केले होते. लवकरच या चित्रपटाचे शुटिंग सुरु होणार आहे. या चित्रपटात देओल कुटुंबीयाच्या तीन पिढ्या दिसणार आहेत. सनी देओल यांचा पुत्र करण हाही या चित्रपटात दिसणार आहे. 'अपने 2' 2021 च्या दिवाळीत रिलीज होणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP Sunny Deol tests positive for COVID19 in Manali Himachal Pradesh