भाजपने सरकारने राष्ट्रीयत्वाचे धडे घ्यावेत: कॉंग्रेस

वृत्तसंस्था
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने राष्ट्रीयत्वाचे धडे घ्यावेत असा सल्ला कॉंग्रेसने दिला आहे.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने राष्ट्रीयत्वाचे धडे घ्यावेत असा सल्ला कॉंग्रेसने दिला आहे.

जम्मू काश्‍मीरमधील नगरोटा येथील लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन अधिकाऱ्यांसह पाच जवान हुतात्मा झाले. या पार्श्‍वभूमीवर आज (बुधवार) कॉंग्रेसच्या नेत्यांनी संसद सभागृहाचा सभात्याग केला. यावर केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी कॉंग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप केला. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना कॉंग्रेस नेते राजीव शुक्‍ला म्हणाले, "जर हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला तर तो सभागृहाचा अवमान होत असेल, तर त्यांनी (भाजप) आधी राष्ट्रीयत्वाचे धडे घ्यावेत.' तसेच "जर विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला तर त्यात काय चूक आहे?', असा प्रश्‍नही शुक्‍ला यांनी उपस्थित केला. कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनीही याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "वेंकय्या नायडू यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कॉंग्रेस कधीही राजकारण करत नाही. जर कॉंग्रेस नेत्यांनी नगरोटा येथे हुतात्मा झालेल्या जवानांप्रित्यर्थ सभात्याग केला तर त्यात कसले राजकारण आहे?', अशा प्रतिक्रिया दिग्विजयसिंह यांनी व्यक्त केल्या आहेत.

नरगोटा येथील दहशतवादी हल्ला आणि नोटाबंदीच्या निर्णयावरून विरोधी पक्षांनी सभागृहात घातलेल्या गोंधळामुळे आज लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. तर राज्यसभेचे नोटाबंदीच्या निर्णयामुळे राज्यसभेचे कामकाजही दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते.

Web Title: BJP must learn nationalism lessons: Congress