Rahul Gandhi : राहुल गांधींनी इतर देशांना भारतात हस्तक्षेप करण्याचे आमंत्रणच दिले; नड्डा यांची टीका |bjp national president jp nadda targeted rahul gandhi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi and JP nadda

Rahul Gandhi : राहुल गांधींनी इतर देशांना भारतात हस्तक्षेप करण्याचे आमंत्रणच दिले; नड्डा यांची टीका

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून टीका होत आहे. आता खुद्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत लोकशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला आहे.

ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांना लोकशाहीत स्थान नाही,' असे त्यांनी 'नॅशनल युथ पार्लमेंट'च्या उद्घाटनानंतर व्हर्च्युअल भाषणात सांगितले. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय देशांसारख्या परकीय शक्तींना चिथावणी देत असल्याचा आरोप करत ते म्हणाले की, काँग्रेस आज मानसिक दिवाळखोरीने ग्रस्त आहे.

राहुल गांधी यांनी लोकशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. भारतातील जनता त्यांचे ऐकत नाही, ते फक्त त्यांना त्रास देतात, अस नड्डा म्हणाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले की, राहुल गांधी यांनी भारताच्या लोकशाही मूल्यांबद्दल लज्जास्पद वक्तव्य करून केवळ देशाचा अपमान केला नाही तर इतर देशांनाही आपल्या देशात हस्तक्षेप करण्याचे आमंत्रण दिले आहे.

ब्रिटनमध्ये केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी राहुल गांधी यांनी संसदेत बोलण्याची परवानगी मागितली आहे.