भाजपच्या मोठ्या नेत्यामध्ये covid-19 ची लक्षणे; रुग्णालयात केलं दाखल

पीटीआय
गुरुवार, 28 मे 2020

कोरोना महामारीने जगासह देशामध्ये थैमान घातले आहे. गरीब, श्रीमंत, जात, धर्म, लिंग न पाहता कोरोना व्हायरस सर्वत्र पसरत आहे. अशात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर गुरुग्रामच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दिल्ली - कोरोना महामारीने जगासह देशामध्ये थैमान घातले आहे. गरीब, श्रीमंत, जात, धर्म, लिंग न पाहता कोरोना व्हायरस सर्वत्र पसरत आहे. अशात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर गुरुग्रामच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बुधवारी संबित पात्रा यांच्यामध्ये covid-19 ची लक्षणे दिसू लागली होती. त्यामुळे त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबित पात्रा हे भाजपमधील लोकप्रिय नेते आहेत. ते अनेक वृत्तवाहिन्यांवर भाजपची भूमिका जोरकसपणे मांडत असतात. सोशल मीडियावरही त्यांचे व्हिडीओ प्रचंड गाजत असतात. त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरची लक्षणे दिसून आल्याने भाजप नेत्यांमध्ये चिंता आहे.

बाळाला कुशीत घेऊन 7 तास फिरत होतो बाप; उपचार न मिळाल्याने चिमुकल्याचा मृत्यू

संबित पात्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांनी बुधवारीच एक ट्विट केलं होतं. ट्विटरवर त्यांचे 44 लाख फॉलोवर आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp national speaker sanbit patra have covid19 symutums