भाजप अद्याप सोडलेले नाहीः सिद्धूची पत्नी

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली-  भारतीय जनता पक्षाचा (भाजप) राजीनामा दिला नसून, भाजप अद्याप सोडलेले नाही, असा खुलासा नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी आज (मंगळवार) केला आहे.

नवी दिल्ली-  भारतीय जनता पक्षाचा (भाजप) राजीनामा दिला नसून, भाजप अद्याप सोडलेले नाही, असा खुलासा नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी आज (मंगळवार) केला आहे.

भाजपने राज्यसभेवर आणलेले नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोमवारी (ता. 18) सोमवारी जेमतेम महिनाभरातच राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनीही राजीनामा दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. नवज्योत कौर सिद्धू पंजाब विधानसभेमध्ये भाजपच्या आमदार आहेत.
 
नवज्योत कौर सिद्धू म्हणाल्या, ‘माझे पती नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजप खासदार पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना पंजाबची सेवा करायची असून, त्यांचे ध्येय स्पष्ट आहे. परंतु, आपण अद्यापही भाजपमध्ये आहोत. मी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. मी माझ्या मतदारसंघामध्ये काम करत आहे.‘

दरम्यान, सिद्धू यांनी सोमवारी दुपारी आपला राजीनामा राज्यसभाध्यक्षांकडे पाठविला. त्यांनी तो स्वीकारल्याची अधिकृत घोषणा दुपारी चार वाजता करण्यात आली. मागील लोकसभेत भाजपतर्फे अमृतसरमधून निवडून आलेले सिद्धू यांचे तिकीट लोकसभा निवडणुकीवेळी अरुण जेटली यांच्यासाठी भाजपने कापले. त्यानंतर ते प्रचंड नाराज झाले. मात्र त्यांनी भाजपच्या विरोधात कधीही वक्तव्य केले नाही. या राज्यात भाजपने अकाली दलाबरोबर युतीत राहण्यास सिद्धू व त्यांच्या पत्नींचा कडाडून विरोध आहे. त्यातूनच "आप‘ने सिद्धू यांना जाळ्यात ओढण्याची धडपड चालविल्याचे सांगितले जाते. पुढील वर्षी निवडणूक होणाऱ्या पंजाबमध्ये सध्या "आप‘ला अनुकूल वातावरण आहे. खुद्द अरविंद केजरीवाल पंजाबबाबत इच्छुक असल्याचे सांगितले जाते, मात्र त्या पक्षाने बालिशपणे आपल्याच जाहीरनाम्याची तुलना "गुरू ग्रंथसाहिब‘बरोबर केल्यानंतर "आप‘विरुद्ध प्रक्षोभ निर्माण झाला होता. त्यामुळे पंजाबमध्ये "आप‘ला एक लोकप्रिय चेहरा हवा आहे व सिद्धू यांच्या रूपाने तो मिळाल्यास पंजाबमध्ये "आप‘ आणखी सुस्थितीत येईल, असे सांगितले जाते.

Web Title: BJP not have yet abandoned the : Sidhu wife

टॅग्स