esakal | मध्य प्रदेशात भाजपचे ऑपरेशन कमळ फसले, कसं? 
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

आमदार कमलनाथ यांच्या घरी 
दिल्लीवरून भोपाळला परतलेल्या सहा आमदारांना विमानतळावरून थेट मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. याआधी कमलनाथ यांनी अन्य आमदारांशी चर्चा करत त्यांना खरेदी करण्याचा तर कुणी प्रयत्न केलेला नाही ना हे जाणून घेतले, या वेळी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी दीपक बावरियादेखील उपस्थित होते.

मध्य प्रदेशात भाजपचे ऑपरेशन कमळ फसले, कसं? 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

भोपाळ : मध्य प्रदेशात भाजपच्या सत्ताकांक्षेमुळे आज पुन्हा एकदा नवे सत्तानाट्य रंगले. काँग्रेसच्या विद्यमान कमलनाथ सरकारला सुरुंग लावण्यासाठी भाजपने आमच्या नऊ आमदारांना गुरुग्राम येथील एका हॉटेलात कोंडून ठेवल्याचा आरोप काँग्रेसने केल्यानंतर येथील राजकीय घोडेबाजार चर्चेचा विषय ठरला होता. यातील सहा आमदार हे आज दुपारीच मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भेटीला आल्याने भाजपचे ऑपरेशन कमळ फसल्याची चर्चा आहे. 

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी आज सकाळीच भाजपवर आमदारांच्या घोडेबाजाराचा आरोप केला होता, त्यांनी भाजपने आमच्या काही आमदारांना दिल्लीला पळविल्याचे म्हटले होते. दिग्गीराजांच्या या ट्विटपाठोपाठ भाजप नेते शिवराजसिंह चौहान हे दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय चर्चांना जोर चढला. भाजपने काँग्रेसच्या सहा, बसपच्या दोन (एक निलंबित) आणि एका अपक्ष आमदाराला गुडगावमधील एका पंचतारांकित हॉटेलात कोंडून ठेवल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. काँग्रेसचे मंत्री जितू पटवारी आणि जयवर्धन सिंह यांनी यानंतर तातडीने दिल्लीला रवाना होत या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आज दुपारीच सहा आमदार पुन्हा भोपाळला पोचले. यामध्ये समाजवादी पक्षाचे राजेश शुक्ला, बसपचे संजीवसिंह कुशवाह, काँग्रेसचे ऐंदलसिंह कंसाना, रणवीर जाटव, कमलेश जाटव आणि बसपमधून हकालपट्टी झालेल्या रमाबाई यांचा समावेश होता. आणखी चार आमदार बेपत्ता असल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. यामध्ये काँग्रेसचे बिसाहूलाल, हरदीपसिंह डंग, रघुराज कंसाना आणि अपक्ष सुरेंद्रसिंह शेरा यांचा समावेश आहे. 

आमदार कमलनाथ यांच्या घरी 
दिल्लीवरून भोपाळला परतलेल्या सहा आमदारांना विमानतळावरून थेट मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. याआधी कमलनाथ यांनी अन्य आमदारांशी चर्चा करत त्यांना खरेदी करण्याचा तर कुणी प्रयत्न केलेला नाही ना हे जाणून घेतले, या वेळी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी दीपक बावरियादेखील उपस्थित होते. मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यापमं गैरव्यवहारप्रकरणी जागल्याची भूमिका पार पडणाऱ्या डॉ. आनंद राय यांनी आज वर्षभरापूर्वीचा एक कथित व्हिडिओ जारी करत भाजपकडून घोडेबाजार केला जात असल्याचा आरोप केला. भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांनी प्रत्येक आमदाराला शंभर कोटी रुपये आणि मंत्रिपदाचे आमिष दाखविले असल्याचे राय यांनी म्हटले आहे.