साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना भाजपने पुन्हा घेतले फैलावर

pragyasinghthakur
pragyasinghthakur

नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यांमुळे वारंवार भाजपला अडचणीत आणणाऱया भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडविणाऱया वक्तव्यानंतर भाजपने त्यांची गंभीर दखल घेत त्यांना कडक समज दिली आहे. पक्षाचे कार्याकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा व संघटनमंत्री बी. एल. संतोष यांनी ठाकूर यांना आज राजधानीतील पक्ष मुख्यालयात बोलावून त्यांना वाणीसंयम बाळगण्याची सूचना केली.

खासदार ठाकूर यांनी राममंदिरापासून महात्मा गांधींंचा मारेकरी नथुराम गोडसेचे गोडवे गाण्यापर्यंत अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. खासदारकीची शपथ घेताना त्या राज्यघटनेलाही जुमानत नसल्याचा आरोप झाला होता. गोडसेबाबतच्या वक्तव्यावर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नाराजी व्यक्त केली होती. पण सत्तारूढ पक्षाने त्याबद्दल अद्याप काहीही कारवाई केली नाही.

आता मात्र त्यांनी शौचालये व स्वच्छतेबाबत नकारार्थी वक्तव्य केल्याने त्यांना कडक समज करण्याची गरज भाजप नेतृत्वाला भासली. आम्ही नाल्या साफ करायला व शौचायल साफ करायला खासदार झालेलो नाही हे ठाकूर यांचे वक्तव्य पंतप्रधानांच्या जिव्हाळ्याच्या स्वच्छ भारत योजनेवरच हल्ला करणारे मानले जात आहे. यावेळेस साध्वी यांना आवरले नाही तर चुकीचा संदेश जाऊ शकतो हे लक्षात आल्यावर त्यांना आज भाजप मुख्यालयात बोलावून घेण्यात आले. त्यांनी वाणीसंयम बाळगला नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याची वेळ येईल असे त्यांना कडक शब्दांत सागण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या वक्तव्यांमुळए सरकारच्या प्रतिमेवरच आघात होत अस्लायचेही त्यांना सांगण्यात आले. खासदार ठाकूर जेव्हा मुख्यालयातून बाहेर पडल्या तेव्हा त्यांचा चेहरा बरेच काही सांगून जाणारा होता. 

काही आश्चर्य नाही : ओवेसी
दरम्यान, खासदार ठाकूर यांचे वक्तव्य बिलकूल आश्चयर्कारक नाही अशी प्रतिक्रिया एमआयएमचे नेते, बॅरीस्टर असदुद्दीन ओवेसी यांनी दिली आहे. ओवेसी म्हणाले की त्यांची विचार प्रक्रियाच जातीयवादी व वर्णाश्रम व्यवस्थेचे समर्थन करणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत योजनेचा उघड विरोध ठाकूर यांनी केला आहे. मात्र अशा जातीवर्ण आधारित भेदभावाच्या विचारसरणीला भाजप उचलून धरतो, हे दुर्देवी असल्याचे त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com