मोदींच्या विरोधकांना 'सोशल' लक्ष्य करण्याच्या थेट सूचना

वृत्तसंस्था
बुधवार, 28 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- भारतातील सार्वजनिक क्षेत्रांतील ज्या व्यक्तींनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला नाही अशांना फेसबुक, ट्विटर या सोशल मीडिया संकेतस्थळांवरून टीकेचे लक्ष्य करा, त्यांना 'ट्रोल' करा असे थेट भाजप पक्षातून सांगितले जात होते, असा खुलासा नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात करण्यात आला आहे.

भाजपच्या माजी कार्यकर्त्या साध्वी खोसला यांनी हा खुलासा केला आहे. पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'आय अॅम अ ट्रोल' या पुस्तकाचे मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. अर्वाच्य टीका करणारी सोशल मीडिया अकाऊंट्स आणि भाजप यांच्यातील संबंधांचा माग काढण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.
 
नरेंद्र मोदी यांच्या 2014 मधील प्रचार मोहिमेत सोशल मीडियावर काम करणाऱ्या स्वयंसेवकांना सांगण्यात आले होते की, भाजपच्या विरोधातील व्यक्तींवर टीका करणारे करणारे मेसेज पसरवा. अशा लक्ष्य करण्यात आलेल्या व्यक्तींच्या यादीमध्ये अभिनेते, पत्रकार यांचाही समावेश होता. 
ट्रोलच्या हिट लिस्टमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, अभिनेता आमीर खान हे होते असे खोसला यांनी दिलेल्या स्क्रीनशॉटवरून स्पष्ट होत असल्याचे द गार्डियन या वृत्तपत्राने म्हटले आहे. 
 
भारतीय जनता पक्षामध्ये 37 वर्षीय खोसला यांनी स्वयंसेवक म्हणून पूर्वी काम केले असून, वैयक्तिक अर्वाच्य टीका करणारे संदेश पाठविण्यास सांगणारा भाजपचा सोशल मीडिया विभाग अद्यापही तसाच कार्यरत आहे, असे खोसला यांनी सांगितले. 
 
Web Title: BJP ordered online abuse of opponents, claims book