सत्तेसाठी भाजपची मदत घेणार नाही - मायावती

वृत्तसंस्था
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आपला पक्ष कधीच भाजपची मदत घेणार नाही, ताज कॉरिडॉर प्रकरणात 2003 मध्ये भाजपने आपल्याला कशापद्धतीने लक्ष्य केले होते, हे आपण विसरलेलो नाहीत. पुढील निवडणुकीत आपलाच पक्ष बहुमत प्राप्त करेल, असा विश्‍वास बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी एक वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केला.

निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाला मतदान करून चूक केल्याची जाणीव मतदारांना झाली असून, आता हेच मतदार बहुजन समाज पक्षाला मते देतील. समाजवादी पक्षात अंतर्गत संघर्ष शिगेला पेटला असून, मुस्लिम आता त्या पक्षाला मते देऊन ती वाया घालवणार नाहीत. कॉंग्रेसला राज्यात जनाधार राहिलेला नाही. समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात राज्यात चारशे दंगली झाल्या. मी मुख्यमंत्री असताना एकही दंगल झाली नाही. भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याचे सामर्थ्य केवळ बहुजन समाज पक्षातच असल्याचेही त्यांनी सांगितले.

विकासासाठी भाजपला हवे बहुमत - अमित शहा
उत्तर प्रदेशातील निवडणूक सर्वाधिक महत्त्वपूर्ण असून, मागील पंधरा वर्षांपासून थांबलेला विकासाचा गाडा पुन्हा रुळावर आणायचा असेल, तर भाजपला बहुमत मिळणे गरजेचे आहे. राज्यामध्ये भाजपचे सरकार आले तर पाच वर्षांत राज्याचा चेहरामोहरा बदलून टाकू, असे प्रतिपादन पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी येथे आयोजित परिवर्तन रॅलीमध्ये बोलताना केले. या वेळी शहा यांनी, समाजवादी पक्ष, कॉंग्रेस आणि बहुजन समाज पक्षावर जोरदार टीका केली.

ज्या पक्षावर विकासाची जबाबदारी आहे, त्याच पक्षातील काका-पुतणे आपापसांत भांडत आहेत. अखिलेश यांना विकासपुरुष बनायचे स्वप्न पडत असून, त्यांनीच आता अफझल आणि मुख्तार आपल्या पक्षामध्ये आहेत की नाहीत याचे उत्तर द्यावे, असेही त्यांनी नमूद केले. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी राज्यातील कायदासुव्यवस्थेचा मुद्दा मांडला; पण त्या हे विसरल्या आहेत, की त्यांच्याच राजवटीत राज्यातील गुन्हेगारी वाढली, असे शहा यांनी सांगितले.

Web Title: BJP to power will not help