'चौकीदार' सत्तेवर आल्याने 'ते' घाबरले : अमित शहा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

आमच्या सरकारने नोटाबंदीदरम्यान 3 लाख बनावट कंपन्या बंद केल्या. आमच्या सरकारवर विविध आरोप केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. मात्र, आमचे सरकार बेदाग आहे.

- अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

नवी दिल्ली : आमच्या सरकारने नोटाबंदीदरम्यान 3 लाख बनावट कंपन्या बंद केल्या. आमच्या सरकारवर विविध आरोप केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. मात्र, आमचे सरकार बेदाग आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले.

तसेच राहुल गांधी नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. मात्र, आई आणि मुलगा जामिनावर आहेत, अशा शब्दांत त्यांनी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यांच्यावर निशाणा साधला. 

दरम्यान, अमित शहांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा उल्लेख 'मौनीबाबा' म्हणून केला.

अमित शहा यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :

- एकाच कुटुंबाने 55 वर्षे देशात राज्य केले. 

- मोदींच्या सरकारमध्ये 60 लाख बँक खाते देण्याचे काम करण्यात आले.

- यापूर्वी देशातील 12 कोटी कुटुंबात स्वच्छतागृह नव्हते. मात्र, आता 9 कोटी कुटुंबात स्वच्छतागृह देण्यात आली आहेत.

- अडीच कोटी घरांपैकी 95 टक्के लोकांना पहिल्यांदा विज देण्याचे काम सरकारने केले. 

- 'वन रँक, वन पेन्शन'चे काम सरकारने केले.

- यापूर्वी जवानांना गोळीसाठी परवानगी घ्यावी लागत होती. मात्र, आता सेनेला आदेश देण्यात आले, की गोळीचे उत्तर गोळ्याने द्यावे. 

- नक्षलवाद, माओवाद संपत आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहे.

- 218 टक्के दहशतवाद्यांना मारण्याचा आकडा मोदी सरकारच्या काळातील आहे.

- मोदींनी आदेश दिल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईसाठी जवान पाकिस्तानात घुसले होते. त्यांनी ही कारवाई केली.

- नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात मोदी सरकारला यश

- सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईच्या माध्यमातून उरीतील हुतात्मांचा बदला घेतला.

- उत्तरप्रदेशात भाजपचा अभूतपूर्व विजय होईल.

- 2022 पर्यंत पक्क घर नसलेले एकही कुटुंब नसेल.

- सौभाग्य योजनेच्या माध्यमातून गरिबांना विज देण्यात आली.

- देशातील घुसखोरांना शोधून बाहेर काढू

- नोटांबदीदरम्यान 3 लाख बनावट कंपन्या बंद केल्या.

- 80 हजार कोटींचा भ्रष्टाचार बंद केला आणि थेट ग्राहकांच्या खात्यात पैसे देण्यात आले.

- आमचे सरकार बेदाग

- आई-मुलगा जामिनावर आहे.

- राहुल गांधी नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे. मात्र, देशातील जनता यामुळे भूलणार नाही.

- राहुल गांधी कोणत्याही आधाराविना आरोप करत आहेत. 

- सर्वोच्च न्यायालयात आमच्याविरोधातील पुरावे द्यावे. पण सत्य सूर्याप्रमाणे बाहेर आले. 

- चौकीदार सत्तेवर आल्याने ते घाबरले आणि पळून गेले.

- चौकीदार सर्व चोरांना पकडून आणेल. 

Web Title: BJP President Amit Shah Criticizes Congress and Rahul Gandhi